मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार, रवी राणांचा इशारा

मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार, रवी राणांचा इशारा

राज्यात हनुमान चालिसा पठण करण्यावरून आणि मशिदीच्या भोंग्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमच्या हृदयामध्ये आहेत. मातोश्री आमचे श्रद्धास्थान आहे. मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचली तर सर्व विघ्न दूर होतील. त्यांनी हनुमान जयंतीच्या शुभ मुहुर्तावर वाचली नाही. त्यामुळे आम्ही आता अत्यंत श्रद्धेनं अमरावती ते मातोश्री अशी वारी करुन हनुमान चालिसा पठण करणार, असा इशारा आमदार रवी राणा यांनी राज्य सरकारला दिला आहे.

हनुमान चालीसा वाचण्यासाठी महाविकास आघाडीची परवानगी घ्यावी लागते का? असा सवाल रवी राणा यांनी उपस्थित केला. आम्ही अत्यंत श्रद्धेने मातोश्रीची वारी करणार आहोत. अनेक संकटांना सामोरे जायची आमची तयारी आहे. आम्ही जाणार म्हणजे जाणारच असा निर्धारही राणा यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांचेच सरकार आहे. तसेच त्यांचेच पोलीस आहेत. हनुमान चालिसाचा विरोध जर त्यांनी हनुमान जयंती दिवशी केला. जर त्यांना वाटलं की त्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांचा दुरूपयोग करायचा आहे. तर पोलीस आम्हाला थांबवतील. परंतु आम्ही एका श्रद्धेने वारी करत आहोत. त्या वारीसाठी मुख्यमंत्र्यांनी मोठं मन करून हनुमान चालिसा वाचू दिली पाहीजे. वेळ असेल तर त्यांनी सुद्धा आमच्यासोबत वाचायला पाहीजे. महाराष्ट्रातील विघ्न दूर करण्यासाठी त्यांनी हनुमान चालिसाच्या माध्यमातून दोन पाऊलं पुढे टाकली पाहीजेत, असं रवी राणा म्हणाले.

मला मुंबईत येऊन दाखवण्याचे आव्हान शिवसैनिकांनी दिले होते. दोन-तीन दिवस वाट बघूनही त्यांच्याकडून तारीख आणि वेळ मात्र काही सांगण्यात आली नाही. उद्धव ठाकरे यांचा हनुमान चालीसाला इतका विरोध का? हे समजायला मार्ग नसल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : Electricity Bill : अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल नियमानुसारच; महावितरणचे स्पष्टीकरण


 

First Published on: April 21, 2022 8:59 AM
Exit mobile version