वंदे मातरम’वरून उफाळणार नवा वाद? रझा अकादमीचा आदेशास विरोध

वंदे मातरम’वरून उफाळणार नवा वाद? रझा अकादमीचा आदेशास विरोध

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर झाले. या खातेवाटपात भाजपतील 9 मंत्र्यांमधील सुधीर मुनगंटीवार यांना वनखात्यासोबत सांस्कृतिक खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. खाते वाटप जाहीर होताच सुधीर मुनगंटीवार यांनी नवी घोषणा केली आहे. मुनगंटीवार यांनी सरकारी कार्यालयात फोनवर बोलताना ‘नमस्कार’ ऐवजी वंदे मातरम बोलण्याता निर्णय जाहीर केला. मात्र या निर्णयाला आता रजा अकादमीने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या निर्णयावरून आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

मुनगंटीवर यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री पदाचा पदभार स्वीकराल्यानंतर अवघ्या चार तासांत हा निर्णय जाहीर केला, मात्र रजा अकादमीला हा निर्णय मान्य नाही. रजा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांच्यामार्फत सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविला जात आहे. आमच्यात फक्त अल्लाहची पूजा केली जाते. त्यामुळे सरकारने त्याऐवजी दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा जो सर्वांना मान्य असेल. याबाबत आम्ही उलेमा आणि इतर संबंधितांशी चर्चा करून सरकारला पत्र लिहिणार असल्याचं रझा अकादमीचे सईद नुरी यांनी स्पष्ट केले आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सांस्‍कृतिक खात्‍याची जबाबदारी येताच सुधीर मुनगंटीवारांनी ही महत्त्वाची घोषणा केली. यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वंदे मातरम् हे आपले राष्‍ट्रगीत आहे. हा केवळ एक शब्‍द नसून भारतीयांचे भारत मातेविषयीच्या भावनांचे एक प्रतीक आहे. आपण फोन उचलल्याबरोबक हॅलो असे म्हणतो, पण हा शब्द देश गुलामगिरीत असताना इंग्रजींनी दिला. मात्र स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम म्हणत तिरंगा हातात घेऊन, या देशाचं स्वातंत्र्य मंगलकलशाच्या रुपाने दिले. यामुळे इंग्रजांची छाप अजूनही आपल्यावर कमी होत नाही. म्हणून आज सांस्कृतिक विभागाच्या मंत्रालयाचा मंत्री म्हणून पहिला निर्णय जाहीर करतोय, आता हॅलो नाही… वंदे मातरम बोलायचं….! असही ते म्हणाले.

मात्र रजा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांनी या निर्णयावर राज्य सरकारला पत्र लिहिणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच यातून काहीतरी तोडगा काढू असही ते म्हणाले. त्यामुळे मुनगंटीवारांना पहिलाच निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.


रोजगार वाढीसाठी मुख्यमंत्र्याचा कौशल्यविकासावर भर, स्टार्टअप यात्रेला दिला हिरवा झेंडा

First Published on: August 15, 2022 3:35 PM
Exit mobile version