विद्यापीठात संशोधन व्हावे : अमित देशमुख

विद्यापीठात संशोधन व्हावे  : अमित देशमुख

अमित देशमुख – लातूर शहर

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात केवळ पुस्तकी ज्ञान न देता संशोधन व्हावे ते प्रायोगिक असावे. जगातील नामांकित विद्यापीठांपैकी एक म्हणून या आरोग्य विद्यापीठाचा नावलौकिक व्हावा यादृष्टीने शासन स्तरावरून देखील लवकरात लवकर पाउले उचलली जातील असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले.

आरोग्य विद्यापीठाच्या प्रशासकिय इमारतीच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ, आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. तात्याराव लहाने, प्रा. मोहन खामगांवकर, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, डॉ. कालिदास चव्हाण आदि उपस्थित होते. यावेळी बोलतांना वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे देशातील उच्च दर्जाचे एक विद्यापीठ आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या विद्यापीठाचा नावलौकिक कसा होईल या दिशेने आम्ही पाउले टाकत आहोत. मला खत्री आहे आगामी काळात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठात आरोग्य विद्यापीठाचे नाव घेतले जाईल. कोरोनाची महामारी त्यानंतर अनंत अडचणींना आपण तोंड देत आहोत. विद्यापीठात अभ्यासक्रम कसे राबवावे, परिक्षा कशा घ्याव्यात यातून आपण मार्गक्रमण करत आहोत. परंतु वैद्यकिय शिक्षणात अनंत अडचणी येउनही आपण त्यावर मात केली. अनेक योजना आपण जाहीर केल्या. परिक्षाबाबत मतमतांतर होती. याकरीता जगाचा अभ्यास केला. तेव्हा आम्हाला असे जाणवले कि, या परिक्षा घेणे क्रमप्राप्त आहे. राज्यातील वैद्यकिय शिक्षणातील विद्यार्थ्याला जगाशी स्पर्धा करावी लागणार आहे. त्यामुळे जगाशी स्पर्धा करतांना आपल्यालाही त्यांच्याप्रमाणेच पाउले टाकावी लागतील आणि त्या दृष्टीने आम्ही नियोजन केले.

यावेळी त्यांनी राज्यपालांचे विशेष आभार मानले, मी जेव्हा जेव्हा आपणांकडे येतो तेव्हा आपण भरभरून मदत करतात. जी दिशा देतात त्यामुळे विद्यापीठाची आगेकुच करण्यात बळ प्राप्त होते. सौरउर्जा प्रकल्प ही त्यांची कल्पना आहे. हा प्रकल्प म्हणजे सुरूवात आहे. हे विद्यापीठ नव्हे उर्जा पीठ व्हावे यादृष्टीने यापुढे पावले टाकले पाहीजे. विद्यापीठाला बाहय उर्जा घेण्याची आवश्यकता भासू नये आंतरिक उर्जा येथे तयार व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठात संशोधन झाले पाहीजे असे सांगतांना ते म्हणाले, संशोधन पुस्तकी नको, प्रायोगिक असावे. येणारया कालावधीत लवकरच विद्यापीठाच्या आवारात मेडीसीन, आर्युवेद, नॅचरोपॅथी, योगा या सर्वांचे संशोधन, प्रशिक्षण हे विद्यापीठाचे घटक बनले पाहीजे. याकरीता जगातील वैद्यकिय क्षेत्रातील विद्यापीठांचा अभ्यास करा अशा सूचना त्यांनी केल्या. आर्युवेदाला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे. कोरोनाने तर सर्व पॅथींना एकत्र केले. कोरोना महामारीपूर्वी या सर्व पॅथींमध्ये मतभेद असायचे. पण आता सर्व पॅथी एकत्र काम करताहेत. या सर्वांचा उपयोग कोरोना महामारीवर मात करण्यासाठी होतो हे सिध्द झाले आहे. यापुढेही जर अशा महामारीचा सामना करावा लागला तर आपल्याला त्याचा मुकाबला करता येईल असे ते म्हणाले.

First Published on: November 3, 2020 11:47 AM
Exit mobile version