ब्राम्हण समाजाचीही आरक्षण, एट्रॉसिटी कायद्याची मागणी; अजून कुठल्या आहेत मागण्या?

ब्राम्हण समाजाचीही आरक्षण, एट्रॉसिटी कायद्याची मागणी; अजून कुठल्या आहेत मागण्या?

नाशिक : अखिल भारतीय बहुभाषिक सर्व शाखीय ब्राम्हण महासंघ या ब्राम्हण समाजाच्या शिखर संघटनेचा स्नेह मिलन सोहळा नुकताच नाशिक शहरात पार पडला. शहरातील बीएपीएसच्या स्वामी नारायण सभागृहात हा सोहळा पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडलेल्या कार्यक्रमात नाशिकसह राज्यभरातील सर्व शाखीय ब्राम्हण समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होता. यावेळी ब्राम्हण समजातही मोठ्या प्रमाणात आर्थिक दुर्बल घटक आहेत. तसेच, ब्राम्हण व्यक्तिला समाजात वावरतांना वेळोवेळी मोठ्या प्रमाणात अवहेलनेला सामोरे जावे लागते असा सुर उमटला. स्वातंत्रानंतर ७५ वर्षात ब्राम्हण समजाने कधीही सरकारकडे कुठलीच गोष्टीची मागणी केली नाही. त्याउलट जेव्हा कधी देशाला गरज असेल तेव्हा ब्राम्हण समाज सर्वात अग्रस्थानी उभा असतो. परंतु, आज ब्राम्हण समाजातील अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत तसेच ब्राम्हण व्यक्ति अवहेलनेला सामोरे जात आहे त्यामुळे सरकार दरबारी मांडण्यासाठी काही मागण्यांचा ठराव या स्नेहमिलन सोहळ्यात करण्यात आला.

काय आहेत ठराव ?

First Published on: November 15, 2022 1:42 PM
Exit mobile version