विधान परिषद निवडणूक : २ जागांवर शिवसेना विजयी तर १ जागा लोकभारतीला

विधान परिषद निवडणूक : २ जागांवर शिवसेना विजयी तर १ जागा लोकभारतीला

कोकण पदवीधर निवडणूक : मतमोजणी

शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या परिषदेच्या चार जागांपैकी २ जांगावर शिवसना तर १ जागेवर लोकभारतीचे उमेदवारांचा विजय झाला आहे. अजूनही कोकण मंडाळाचा निकाल बाकी असून मतमोजणी उद्या पूर्ण होणार आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातील किशोर दराडे आणि मुंबई मतदारसंघात विलास पोतनीस असे शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी बाजी मारली तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोकभारतीचे कपिल पाटील विजयी ठरले आहेत.

नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपचे अनिकेत पाटील, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, आघाडी पुरस्कृत संदीप बेंडसे, भाऊसाहेब कचरे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात होते. येथे झालेल्या मतदानात २० हजारांपैकी १९ हजार ३४१ मतं ग्राह्य धरण्यात आली असून ६३३ मतं ही बाद ठरवण्यात आली होती. तर २६ मतं None of Above (नोटा) ला देण्यात आली आहेत. या उमेदवारांमधून नाशिक शिक्षक मतदारसंघातील किशोर दराडे विजयी ठरले. मुंबई पदवीधर निवडणूकीच्या पहिल्याफेरीत पुढे असेलेल विलास पोतनीस याचा विजय झाला. या निवडणूक संघात त्यांच्या विरोधात भाजपाचे अमितकुमार मेहता उभे होते.

मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोकभारतीचे कपिल पाटील यांनी पहिल्या फेरीतच त्यांनी मोठी आघाडी घेतली होती. मुंबई शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार कपिल पाटील, भाजपचे अनिल देशमुख, शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्यात लढत होती. कपिल पाटील यांना ४०५०, शिवाजी शेंडगेंना १७३६ तर अनिल देशमुख यांना ११२४ मते मिळाली आहेत.

 

विभाग             एकूण मतदार               मतदानाची टक्केवारी
ठाणे                  ४५८३४                           ६७.२७ टक्के
रायगड               १९९१८                           ८१.०७ टक्के
पालघर               १६९८२                           ६३.८९ टक्के
सिंधुदर्गू                ५३०८                           ८८.०६ टक्के
रत्नागिरी              १६२२२                              ८१ टक्के

First Published on: June 28, 2018 10:28 AM
Exit mobile version