दहावी व बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; बारावीचा १८.४१ टक्के तर दहावीचा ३२.६० टक्के निकाल

दहावी व बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; बारावीचा १८.४१ टक्के तर दहावीचा ३२.६० टक्के निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये घेतलेल्या दहावी व बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २३ डिसेंबरला जाहीर झाला. दहावीचा निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा निकाल १८.४१ टक्के लागला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल ९.७४ टक्क्यांनी वाढला. तर बारावीचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत ४.७६ टक्क्यांनी घटला. www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर दहावी व बारावीच्या निकालाची ऑनलाईन प्रत उपलब्ध केली आहे.

दहावीच्या परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातून तब्बल ४४ हजार ८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४१ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या. यातील १३ हजार ४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ३२.६० टक्के इतकी आहे.

बारावीच्या परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य व एचससी व्होकेशनल या शाखांतील ६९ हजार ५४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९ हजार २७४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२ हजार ७५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी १८.४१ टक्के इतकी आहे.

First Published on: December 23, 2020 3:09 PM
Exit mobile version