पुन्हा एकदा ऋषी कपूर यांचे ट्विट वादाच्या भोवऱ्यात

पुन्हा एकदा ऋषी कपूर यांचे ट्विट वादाच्या भोवऱ्यात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन घोषित करण्यात आला. केंद्र सरकार आणि राज्य शासन कोरोनावर मात करण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करत आहे. असे असताना बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी वादग्रस्त ट्विट केले आहे. देशात आणीबाणी घोषित करा, लष्कराला बोलावा; असं ट्विट अभिनेते ऋषी कपूर यांनी केले आहे. आज आपल्या देशात काय होतंय, उद्या काय होणार आहे? म्हणून देशाला सध्या लष्कराच्या मदतीची गरज आहे. असंही ऋषी कपूर म्हणाले.

देशातली परिस्थिती पाहता देशात मद्यविक्रीला परवानगी देण्यात यावी, असेही त्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ऋषी कपूर त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत आहेत. मला चुकीचे समजू नका. घरात बसलेली माणसे प्रचंड नैराश्यात आहेत. पोलीस, डॉक्टर आणि नागरिकांचा ताण कमी करायचा आहे. तसेही काळ्या बाजारात चोरून दारूची विक्री सुरू आहे. सरकारने निदान सायंकाळच्या वेळी परवाना असलेली दारूची दुकाने उघडी ठेवायला हवीत, असे ऋषी कपूर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

First Published on: April 1, 2020 4:37 PM
Exit mobile version