अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे अनेकांचे मत, बॅनरवरून रोहित पवारांची प्रतिक्रिया

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे अनेकांचे मत, बॅनरवरून रोहित पवारांची प्रतिक्रिया

दिवाळीच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. बारामतीत सुद्धा गोविंद बागमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्यांकडून साजरा केला जाणारा दिवाळी पाडवा हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्यामुळे पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी अनेक कार्यकर्ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. यावेळी एका कार्यकर्त्याने अजित पवार यांना राज्याचे भावी मुख्यमंत्री अशी इच्छा व्यक्त करणारा बॅनर आणला होता. दरम्यान, या बॅनरवरून आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे अनेकांचे मत आहे. तसेच माझेही मत आहे. शेवटी आकड्यांचे समीकरण बघावे लागते. येत्या काळात जे काही समीकरण असेल, मित्र पक्षांना विश्वासात घेऊन जो काही निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल, असं पवार म्हणाले.

जेव्हा एखादी ताकदवान व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसतो, ज्याचा प्रशासनावर वचक असतो आणि ज्याला काम करण्याची पद्धत माहिती असते तेव्हा संपूर्ण प्रशासनाची निर्णय घेण्याची क्षमता वाढते, असंही रोहित पवार म्हणाले.

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच होईल. आघाडीमध्ये असताना मोठे निर्णय घेतले जातात. त्यामुळे जो मुख्यमंत्री होईल तो स्वत: निर्णय घेणारा असावा, राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होत असेल तर राज्याला फायदा होईल, असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.


हेही वाचा : माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


 

First Published on: October 26, 2022 6:51 PM
Exit mobile version