शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाची RSS ला अडचण? दुसऱ्या जागेसाठी पालिकेला पत्र

शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाची RSS ला अडचण? दुसऱ्या जागेसाठी पालिकेला पत्र

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरमधील शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाची राष्ट्रीय स्वयंस्वेक संघाला (RSS) अडचण होत आहे. बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी संघाची शाखा भरत होती. मात्र, स्मृतीस्थळाच्या वाढत्या व्यप्तीमुळे संघाला शाखा भरवणं अशक्य होत असल्याचं संघाने म्हटलं आहे. त्यामुळे संघाची शाखा भरवण्यासाठी वेगळा भूखंड देण्याची मागणी महापालिकेकडे पक्षाद्वारे केली आहे.

संघाने म्हटलं आहे की, १९३६ पासून शिवाजी पार्कमध्ये संघाची शाखा भरायची १९६७ पासून २००७ पर्यंत संघाने या भूखंडाचे नियमितपणे भाडे भाडं भरलं असं देखील पत्रात नमुद केलं आहे. परंतु, मुंबई महानगरपालिकेने जमिनीचे आरेखन केलं नाही. त्यामुळे २००८ पासूनचे भाडे थकलं आहे. आम्ही आरेखन मागणी सातत्याने करत आलो परंतु पालिकेने आरेखन केलं नाही. त्यामुळे भाडं थकलं असल्याचं संघाने पत्रात म्हटलं आहे.

हा भुखंड १ हजार ७५५ चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाचा आहे. संघाने ज्या भूखंडाचा दावा केला आहे, त्याला लागूनच बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे. आमच्या सध्याच्या VLT भूखंडाजवळ स्मृतीस्थळ आल्यामुळे आम्हाला आमच्या ताब्यातील VLT भूखंडावर आमचं उपक्रम राबविण्यास अडचणी येत आहेत. तसंच स्मृती स्थळामुळे जागेचं आरेखन करणं जिकीरीचं होईल असं वाटतं. त्यामुळे स्मृती स्थळाची वाढती व्याप्ती लक्षात घेता सदर भूभागाऐवजी शिवाजी पार्क मैदानाजवळील नाना नानी पार्क जवळील मोकळा पर्यायी भूखंड भाडेपट्ट्यावर जागेचे आरेखन करून देण्यात यावा, अशी मागणी संघाने केली आहे. याशिवाय, सदर जागेचे थकीत भूभाडे (VLT RENT) तातडीने स्वीकारावा, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.

First Published on: April 13, 2022 11:37 AM
Exit mobile version