आता शासकीय प्रयोगशाळांसाठी RTPCR कोरोना चाचणी होणार १४८ रुपयात

आता शासकीय प्रयोगशाळांसाठी RTPCR कोरोना चाचणी होणार १४८ रुपयात

केंद्र सरकारने कोरोना चाचणीसाठी आवश्यक असलेले किट तसेच अन्य सामग्री देण्यास नकार दिल्यानंतर आरोग्य विभागाने हाफकिन महामंडळाच्या माध्यमातून जाहीर केलेल्या निविदेत कोरोना चाचणीसाठी लागणारा आरटीपीसीआर किट, व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडियम किट आणि व्हायरल आरएनए एक्स्ट्रॅक्श्न किटसह एकत्रित दर १४८ रुपये आला आहे. संपूर्ण देशात हा दर सर्वात कमी असेल, असा विश्वास आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण यांनी कोरोना चाचणीत २७० कोटींचा घोटाळ्याचा केलेला आरोप हा अज्ञानातून केल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असतानाच केंद्र सरकारने अचानक पीपीई किट, एन ९५ मास्क तसेच कोरोना चाचणी किटचा पुरवठा करण्याचे थांबविण्याचा निर्णय घेतला. केंद्राने हा पुरवठा थांबवू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले त्याचवेळी राज्यात कोरोना चाचणीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी हाफकिन महामंडळाच्या माध्यमातून आरटीपीसीआर किट तसेच चाचणीसाठी लागणाऱ्या अन्य सामग्रीची खरेदीच्या निविदा जाहीर केल्या. मुंबईसह राज्यात करोना चाचण्यांची संख्या वाढवताना खासगी प्रयोगशाळांचे दर कमी व्हावे यासाठीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. यातून आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून खासगी प्रयोगशाळांचे कोरोना चाचणीचे दर ४७०० रुपयांवरून प्रथम २२०० रुपये व आता १२०० रुपये एवढे कमी केले.

हेही वाचा –

काँग्रेस पक्षात बदल; खरगे, गुलाम नबी यांना महासचिव पदावरून हटवले

First Published on: September 11, 2020 10:46 PM
Exit mobile version