अंडे २ रूपयांना, तर चिकन ५० रूपये किलो

अंडे २ रूपयांना, तर चिकन ५० रूपये किलो

बाजारात मिळणाऱ्या चिकनवर कोरोना व्हायरसच्या अफवांचे एकीकडे पिक आलेले असतानाच आता कोंबडीच्या अंड्यांच्या मार्केटवरही त्याचा परिणाम दिसत आहे. देशात मुंबईत अंड्यासाठी सर्वाधिक भाव मिळतो, पण अंड्याच्या किंमतीतही या महिन्याभरात घसरण झाली आहे. मुंबईतच अंड्याच्या किंमतीचा निच्चांक पहायला मिळाला आहे. अर्थात हा निच्चांक घाऊक बाजारात असला तरीही सर्वसामान्यांसाठीही आता अंडे सरासरी ५ रूपयांनी उपलब्ध होत आहे. मुंबईत किमान दराला म्हणजे शेकड्यासाठी ३६५ रूपये इतका फेब्रुवारी महिन्यात अंड्याचा दर खाली घसरला. तर फ्रेब्रुवारी महिन्यात सरासरी किंमत ही शेकड्यासाठी ४०९ रूपये इतकी होती. देशात अंड्याचा भाव हा सर्वाधिक कमी म्हणजे शेकड्यासाठी ३३६ रूपये २० पैसे असा अजमेरमध्ये होता. शेकड्यासाठी २.९५ रूपयांचा भावदेखील २५ फेब्रुवारीला नोंदवला गेला आहे. अजमेर पाठोपाठ हरियाणातील बरवाला येथे अंड्याला कमी भाव मिळाला आहे. त्याठिकाणी शेकड्याला ३३६ रूपये २२ पैसे असा भाव मिळाला आहे.

चिकनचा भावही गडगडला

अंड्यासोबतच चिकनच्या प्रत्येक किलोसाठीच्या भावालाही कोल्हापुरात फटका बसला आहे. कोल्हापुरात चिकन हे ५० रूपये किलोने विकले जात आहे. त्यामुळे तब्बल १५० कोटी रूपयांचा फटका हा पोल्ट्रीच्या व्यवसायात झाला आहे. कोल्हापुरातल्या कोंबड्यांना गोव्यात मोठ्या प्रमाणात मागणी असले. पण गोव्यात पसरलेल्या कोरोना व्हायरच्या अफवेमुळे कोंबड्यांच्या मागणीवर परिणाम झालेला पहायला मिळाला आहे. कोल्हापुरात आजरा तालुक्यातून कोंबड्यांना मोठी मागणी असते. पण कोरोनाच्या अफवांच्या थैमानामुळे या भागातील पोल्ट्री व्यवसाय दरकपातीचे चटके सहन करत आहे. एकट्या कोल्हापुरात पोल्ट्री व्यवसायाला १५० कोटी रूपयांचे नुकसान कोरोना व्हायरसमुळे झाले आहे.

First Published on: February 26, 2020 11:47 AM
Exit mobile version