हिरेन मृत्यू प्रकरणात वाझेंच्या अडचणी वाढल्या; ATS चौकशीसाठी प्रॉडक्शन वॉरंट घेणार

हिरेन मृत्यू प्रकरणात वाझेंच्या अडचणी वाढल्या; ATS चौकशीसाठी प्रॉडक्शन वॉरंट घेणार

मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली असल्याचा संशय एटीएसला असून या संदर्भातील भक्कम पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत. या पुराव्याच्या आधारे सचिन वाझेंच्या चौकशीसाठी न्यायलायकडून प्रॉडक्शन वॉरंट घेणार असल्याचे समजते. दरम्यान एटीएसच्या काळाचौकी येथील युनिट मध्ये गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला गुरुवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ मिळून आलेली स्फोटकांनी भरलेल्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा ५ मार्च रोजी मुंब्रा रेतीबंदर खाडीत मृतदेह आढळून आला होता. मनसुख यांच्या संशयास्पद मृत्यु प्रकरणी एटीएसकडून हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल तेरा दिवसाच्या कसून तपासा नंतर या गुन्ह्या संदर्भातील भक्कम पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत. या पुराव्यावरून एटीएसने मुंबई गुन्हे शाखेच्या एका युनिट प्रमुखाला मनसुख हिरेन प्रकरणात चौकशीसाठी एटीएसच्या काळाचौकी युनिट येथे बोलावून घेतले होते. पोलीस निरीक्षक दर्जाचा या अधिकाऱ्याचे या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय एटीएसला असून त्या संदर्भात या अधिकाऱ्याकडे चौकशी करण्यात येत आहे.

एटीएस आपल्याला अटक करू शकते म्हणून सचिन वाझेंनी एनआयएच्या अटकेपूर्वी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. एटीएस न्यायालयात आपली बाजू मांडून वाझे यांचा ताबा मिळवण्यासाठी न्यायलायकडून आरोपीचे प्रॉडक्शन वॉरंट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.


हेही वाचा – एनआयएच्या पथकासह सचिन वाझे यांचा मुंबई ते ठाणे प्रवास 


 

First Published on: March 19, 2021 8:38 AM
Exit mobile version