लिव्ह इन रिलेशनशीप पुरस्कर्त्या न्यायाधीशांना संपवले पाहिजे, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

लिव्ह इन रिलेशनशीप पुरस्कर्त्या न्यायाधीशांना संपवले पाहिजे, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भिडेंना अटक करावी का? 'My Mahanagar' च्या पोलवर जनतेची प्रतिक्रिया, वाचा...

शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी न्यायाधीशांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पुन्हा वादात सापडले आहेत. संभाजी भिडेंनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, आज लिव्ह इन रिलेशनशीप हा बेशरमपणा बनला आहे. तसेच लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही असं म्हणणाऱ्या न्यायाधीशांना जागेवरून संपवले पाहिजे. मी बोलल्याने माझ्यावर गुन्हे दाखल होतील, काय गुन्हे दाखल करायचे ते करू देत, असं संभाजी भिडे म्हणाले.

राम शास्त्री प्रबोधिनी यांनी राज्यसभेत सांगितले की, देहांताच्या शस्त्राशिवाय दुसरा गुन्हा नाही. अत्यंत गलिच्छ दिशेने आपल्या लोकशाहीची वाटचाल सुरु असून ती थांबवणे आवश्यक आहे, असं देखील भिडे म्हणाले.

वाईनविक्रीचा निर्णय धर्मविरोधी

राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर संभाजी भिडे यांनी टेका केली आहे. वाईनविक्रीचा निर्णय धर्मविरोधी असल्याचे भिडे यांनी म्हटले आहे. त्याचसोबतच त्यांनी नाईट लाईफ संकल्पनेवरही हल्लाबोल केला आहे. नाईट लाईफ म्हणजे सर्वनाश असल्याचे भिडे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राने देशाला देशपन आणि इतिहास दिला

सरकारने वाईन सुरू करून जुगार लावलेला आहे. यावेळी त्यांनी स्वर्गीय आर. आर. पाटील यांचीदेखील आठवण काढली. मला आर आर आबांची आठवण होते. आज ते असते तर हा वाईनचा निर्णय झाला नसता. आरक्षणासाठी हापापलेल्या संस्थानी या निर्णयाविरोधात आवाज उठवला पाहिजे. महाराष्ट्राने देशाला देशपन आणि इतिहास दिला आहे. महाराष्ट्र शासन जर असे काहीही निर्णय घेत असेल, तर महाराष्ट्र कुठे जातोय असे भिडे यावेळी म्हणाले.


हेही वाचा : Pegasus case: नैतिकतेच्या आधारे मोदी सरकारने राजीनामा द्यावा, नाना पटोलेंची मागणी


 

First Published on: January 29, 2022 7:17 PM
Exit mobile version