अखेर संभाजी बिडीला नवं नाव मिळालं!

अखेर संभाजी बिडीला नवं नाव मिळालं!

संभाजी बिडीचं नाव बदललं.

संभाजी बिडीच्या नावावरुन राज्यात चांगलाच वाद सुरु होता. संभाजी बिडीचं नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली. संभाजी ब्रिगेड, शिवप्रेमी संघटना आणि राजकीय संघटनांनी संभाजी बिडीचं नाव बदलण्यासाठी संभाजी बिडीच्या कंपनीकडे मागणी केली होती. त्यानंतर संभाजी बिडीच्या साबळे वाघिरे कंपनीने चार महिन्यांपूर्वी नाव बदलण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचं पत्रक देखील जारी केलं होतं. त्यानंतर चार महिन्यांनी कंपनीला नवं नाव मिळालं आहे.

संभाजी बिडीचं नाव बदलण्याच्या मागणीला प्रतिसाद देताना कंपनीने नाव बदलणार असल्याचं जाहीर केलं. कंपनीने तसं पत्रक काढलं होतं. या पत्रकात त्यांनी नाव बदलण्यास थोडा वेळ लागेल, असं सांगितलं. दरम्यान, आता कंपनीने बिडीचं नाव बदललं आहे. त्यामुळे आता संभाजी बिडी नावाने विकली जाणारी बिडी आता ‘साबळे बिडी’ या नावने विकली जाणार आहे. सर्व संघटनांच्या व जनतेच्या भावनांचा आदर करून आम्ही संभाजी बिडीचं नाव बदलणार असल्याचं पत्रकात म्हटलं होतं.

महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या संभाजी महाराजांचं नाव एका विडीला देण्यावरून शिवप्रेमींच्या भावना तीव्र होत्या. यापूर्वीही याबाबतच्या चर्चेला अनेकदा तोंड फुटलं होतं. मात्र, यावेळी संभाजी ब्रिगेडसह काही संघटनांनी हा विषय लावून धरला होता. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आंदोलनही सुरू केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियातून विषयी आवाज उठवला होता. लोकभावनेचा आदर करून कंपनीनं याबाबत ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यांना भाजपचे आमदार नीतेश राणे यांचीही साथ मिळाली होती. नीतेश यांनी थेट ‘धूर काढण्याची’ भाषा केली होती. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.


हेही वाचा – ग्रामपंचायत उमेदवारांना दिलासा; ‘या App’द्वारे खर्चाचा हिशोब सादर करता येणार


 

First Published on: January 20, 2021 6:52 PM
Exit mobile version