पुण्यातल्या मेट्रो स्टेशन्सला महापुरुषांची नावं द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी

पुण्यातल्या मेट्रो स्टेशन्सला महापुरुषांची नावं द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी

आता हॉल किंवा लॉनमध्ये नाही तर धावत्या मेट्रोत बांधणार लग्नाच्या गाठी

राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे शहरातिल मेट्रोची ट्रायल अलिकडेच पार पडली. या नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी दाैरा केला. या पाहणी दाैऱ्यानतंर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रगंली या नतंर  संभाजी ब्रिगेडनं पुण्यातील मेट्रो स्थानकांना महापुरुषांची नावं द्या अशी मागणी केली या सदंर्भातिल  एक पत्र संभाजी ब्रिगेडनं महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहे अशी माहिती मिळाली . तसेच सदर पत्रात संभाजी ब्रिगेडनं १३ महापुरुषांची नावंही  सुचली आहेत.

  पुणे हे विद्येचे माहेरघर सांस्कृतिक, परिवर्तनवादी व तसेच पुरोगामी चळवळीचा वसा  वारसा जपणारे शहर असून महापुरुषांचा वैचारिक व वारसा आपण जपलं पाहिजे म्हणूनच त्यांच्या विचारांतून प्रेरणा मिळावी  वैचारिक ठेवा जपन्याचे काम केले पाहिजे.पुणे शहरात होणाऱ्या महामेट्रो स्टेशनला १३ महापुरुषांची नावे देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

संभाजी ब्रिगेडनं पत्रात सुचवलेली नावं

१) छत्रपती शिवाजी महाराज,२) छत्रपती संभाजी महाराज,३) मल्हाराव होळकर,४) राजमाता अहिल्या राणी होळकर,५) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,६) राजर्षी छत्रपती शाहू महाराज,७) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,८) लहुजी वस्ताद साळवे,९) दिनकरराव जवळकर,१०) केशवराव जेधे,११) सरसेनापती वीर बाजी पासलकर
१२) महादजी शिंदे, १३) शिवशाहीर अण्णाभाऊ साठे

First Published on: September 6, 2021 7:57 PM
Exit mobile version