या दृश्यामुळे ‘ठाकरे’ सिनेमावरून वाद, संभाजी ब्रिगेडचा इशारा

या दृश्यामुळे ‘ठाकरे’ सिनेमावरून वाद, संभाजी ब्रिगेडचा इशारा

'ठाकरे' सिनेमा

असे खूप कमी चित्रपट असतात, ज्यांची मुहूर्तापासून चर्चा होते. ‘ठाकरे’ हा त्यातलाच एक सिनेमा आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा सिनेमा येत्या २५ जानेवारीला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. पण या सिनेमाला आता संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक कपिल ढोके यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

याकरता केला संभाजी ब्रिगेडने विरोध

‘ठाकरे’ या सिनेमामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारत असून बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई यांची भूमिका अमृता राव साकारताना दिसणार आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पायात पादत्राणं घालून पुष्पहार अपर्ण करताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे सिनेमातील हे दृश्य छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारे आहे. त्यामुळे सिनेमातील हे दृश्य निर्माता आणि दिग्दर्शक यांनी तात्काळ वगळावे अन्यथा या दृश्यासह सिनेमा जर प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला तर संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात एकाही ठिकाणी हा सिनेना प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक कपिल ढोके यांनी दिला आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कर्तृत्व मोठे आहे. त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या सिनेमाला विरोध असण्याचं काही कारणं नाही. परंतु ‘ठाकरे’ या सिनेमातून निर्माते आणि दिग्दर्शक यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. हे आम्ही कदापीही खपवून घेणार नाही. त्यामुळे या सिनेमातील हे दृश्य काढावे आणि त्यानंतर ‘ठाकरे’ हा सिनेमा प्रदर्शित करावा. अन्यथा महाराष्ट्रातल्या एकाही सिनेमागृहात हा सिनेमा प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही.  – कपिल ढोके, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक

वाचा – ‘ठाकरे’ चित्रपटात बाळासाहेबांचा आवाज बदलणार!

पहा – सगळ्यांचा बाप आलाय म्हणतं ठाकरे चित्रपटातील गाणं प्रदर्शित

First Published on: January 19, 2019 4:20 PM
Exit mobile version