मला कमी लेखून चालणार नाही, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे आक्रमक

मला कमी लेखून चालणार नाही, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे आक्रमक

औरंगाबादमध्ये आज मराठा क्रांती मोर्चाचा (Maratha kranti Morcha) पाचवा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje Chhatrapati) यांनी उपस्थिती लावली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी औरंगाबदमध्ये पहिला मूक मोर्चा काढण्यात आला होता त्याला आज ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी जनतेशी संवाद साधला. संभाजीराजे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. (sambhaji raje Chhatrapati aggressive over maratha reservation)

आरक्षणाच्या विषयावर माझ्याइतकी परखडपणे मते मांडणारा नेता समोर येतो का? तर कोणी येत नाही. मी बोलतो म्हणून लोक माझ्यावर टीका करतात. गेली अनेक वर्ष मी माझ्या कुटुंबाला जितका वेळ दिलेला नाहीये तितका वेळ मी या विषयासाठी दिलाय. त्याविषयी कोणीही काही बोलत नाही. संभाजी छत्रपती म्हणजे हिटीस करायचे असे होऊ शकत नाही, असे कोणी बोलले की मला वाईट वाटते. मला कमी लेखून चालणार नाही,असे टोला संभाजीराजेंनी यावेळी विरोधकांना लगावला.

१२७व्या घटनादुरुस्तीबाबत दिल्लीत बोलण्याचे कोणाचे धाडस नव्हते . १२७वी घटनादुरुस्ती ही माझ्यासाठी इतिहासातील सुवर्ण क्षण असल्याचे संभाजीराजेंनी यावेळी म्हटले. औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराज गेले तेव्हा त्यांचा अपमान झाला आणि ते निघून गेले तसेच मला तिथे बोलण्याची संधी दिली नाही म्हणून मला ते भांडून घ्यावे लागले. याबद्दल कोणीही चर्चा करत नाही याचे मला वाईट वाटते, असे संभाजीराजे यांनी म्हटले. दिल्लीत मी माझ्यासाठी भांडलो नाही. आपल्या मराठा समाजाचा आवाज कोणीतरी उठवायला पाहिजे म्हणून मी बोललो,असे संभाजीराजे यांनी म्हटले.


हेही वाचा – मुंबईकर जनता तुमच्या महापालिकेच्या कारभाराला कंटाळली – नारायण राणे

First Published on: August 19, 2021 3:04 PM
Exit mobile version