हवं ते करा पण गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या – संभाजीराजे छत्रपती

हवं ते करा पण गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या – संभाजीराजे छत्रपती

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यामुळे मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. जे केंद्र सरकारच्या हातात आहे ते केंद्र सरकारने द्यावे आणि जे राज्य सरकारच्या हाती आहे ते राज्य सरकारने द्यावे असे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटले आहे. हवं ते करा पण मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी १९०२ ला बहुजन समाजाला आरक्षण दिले. पहिल्यांदा देशात त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश आहे. या महापुरुषांनी जी काही रचना रचलेली आहे ती आता महाराष्ट्राल लागू होत नाही का? असा सवाल राजेंनी सर्व राजकीय नेत्यांसमोर उपस्थित केला आहे.

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मराठा आरक्षणावर पुढील भूमिका काय आता हा आरक्षणाचा विषय सोडून द्यावा का किंबहुना दिशा कशी राहील हा विषय सर्व मराठा समाजाच्या पुढे असल्यामुळे महाराष्ट्रा दौरा करुन लोकांच्या भावना समजून घेत आहे. या दौऱ्यामध्ये कुठल्याही पक्षाशी विरोध नाही आहे त्याची काही भूमिका असेल परंतु माझी भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला दिशा दाखवणे, जे शक्य आहे ते मागणी आणि जे शक्य नाही आहे त्याकडे लक्ष न देणे हेच प्रामुख्य असून दौरा करत आहे. असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

माझे-तुझे करण्यापेक्षा मराठा समाजाला काय देणार

मी एक समाजाचा घटक आहे. संभाजी छत्रपतींच्या भूमिकेपेक्षा समाजाची काय भूमिक आहे हे मांडण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता अनेक दिवस दौरे आहेत. शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना देखील भेटणार आहे. सगळ्यांच्या भेटीगाठी होणार आहेत. यातून कसे पुढे जायचे, माझे-तुझे करण्यापेक्षा मराठा समाजाला काय देणार मग ते राज्य असो अथवा केंद्र असो ही भूमिका मांडण्यासाठी २८ मे रोजी प्रयत्न करणार आहे.

मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली आहे. प्रामुख्याने ७० टक्के मराठा समाज हा गरीब मराठा समाज आहे. जे काही करायचे आहे ते करा. इतर बहुजन समाजाला जो न्याय मिळतो तोच न्याय मराठा समाजाला द्या असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण करताना १८ पगड जाती आणि १२ बलुतेदारांना न्याय दिला स्वराज्य हे मराठ्यांचे नाही तर १८ पगड आणि १२ बलुतेदारांचेही आहे.

मराठा समाजाला कायतरी न्याय द्यावा

राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी १९०२ ला बहुजन समाजाला आरक्षण दिले. पहिल्यांदा देशात त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश आहे. या महापुरुषांनी जी काही रचना रचलेली आहे ती आता महाराष्ट्राल लागू होत नाही का? असा सवाल राजेंनी सर्व राजकीय नेत्यांसमोर उपस्थित केला आहे. मराठा पुढारलेला आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे म्हणून आम्ही गप्प बसायचे का? आम्हाला मराठा समाजाला कायतरी न्याय द्यावा. जे केंद्र सरकारच्या हातात आहे ते केंद्र सरकारने द्यावे आणि जे राज्य सरकारच्या हातात आहे ते राज्य सरकारने द्यावे असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

First Published on: May 26, 2021 11:55 AM
Exit mobile version