स्वराज्य हे विस्थापितांचं असून त्यांना संघटित करण्याचं काम सुरू – संभाजीराजे छत्रपती

स्वराज्य हे विस्थापितांचं असून त्यांना संघटित करण्याचं काम सुरू – संभाजीराजे छत्रपती

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मला जबाबदारी दिली नाही हा इतिहास आहे. यावर मला भाष्य करायचं नाहीये. परंतु स्वराज्य हे विस्थापितांचं असून त्यांना संघटित करण्याचं काम सुरू असल्याचं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. औरंगाबादमध्ये त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीबाबत आणि स्वराज्याबाबत भाष्य केलं आहे.

राज्यात सध्या अनेक मोठे प्रश्न आहेत. यामध्ये विद्यार्थी, शेतकरी आणि पावसाची चिंता अशा प्रकारचे प्रश्न आहेत. पण जे कुणाचं सरकार असेल ते लवकर स्थापन व्हावं, असं संभाजीराजे म्हणाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती असल्याने त्यांनी अभिवादन केलं असून सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलणं टाळलं आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचं कबूल केलं होतं. परंतु ऐनवेळी शिवसेनेने संभाजीराजे यांच्या व्यतिरिक्त कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली. परंतु यामध्ये त्यांचा पराभव झाला. राज्यसभेच्या एका जागेसाठी कोल्हापूरमध्ये संजय पवार आणि भाजपचे नेते धनंजय महाडिक यांच्यामध्ये चुरस सुरू होती. यामध्ये धनंजय महाडिक यांनी संजय पवार यांचा पराभव करत खासदारकी मिळवली. महाडिक यांचा विजय झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधानपरिषदेत देखील महाविकास आघाडीचा पराभव झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. परंतु आता राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.


हेही वाचा : अपात्रतेच्या कारवाईविरोधात शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात धाव


 

First Published on: June 26, 2022 9:39 PM
Exit mobile version