गुन्हा दाखल करायचाय तर माझ्यावर करा; संभाजीराजे कडाडले

गुन्हा दाखल करायचाय तर माझ्यावर करा; संभाजीराजे कडाडले

गुन्हा दाखल करायचाय तर माझ्यावर करा; संभाजीराजे कडाडले

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) नांदेडमध्ये शुक्रवारी मराठा समाजाने आंदोलन केलं. या प्रकरणी २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाईवर खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) संताप व्यक्त केला. गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरीब मराठा बांधवांच्यावर का? असा सवाल संभाजीराजे यांनी केला.

संभाजीराजे यांनी ट्विट करत पोलिसांच्या कारवाईवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय असं का? असा सवाल देखील संभाजीराजे यांनी केला आहे. “गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा! सामान्य गरीब मराठा बांधवांच्यावर का? समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का?” असं ट्विट संभाजीराजे यांनी केलं आहे.

२१ जणांवर गुन्हे दाखल

मराठा मूक आंदोलन प्रकरणी २१ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना काळात गर्दी जमवल्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वजिराबाद पोलीस ठाण्यात हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

 

First Published on: August 21, 2021 6:24 PM
Exit mobile version