sameer wankhede: समीर वानखेडेंची DRI मध्ये बदली, NCBमधील कार्यकाळ संपुष्टात

sameer wankhede: समीर वानखेडेंची DRI मध्ये बदली, NCBमधील कार्यकाळ संपुष्टात

राज्यातील मुंबई एनसीबीचे (NCB) उपविभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांचा एनसीबीमधील कार्यकाळ संपला आहे. वानखेडेंचा कार्यकाळ यापूर्वाच संपुष्टात आला होता पंरतु त्यांना कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरण (drugs case) आणि आर्यन खान प्रकरणामुळे मुदतवाढ दिली होती. आता समीर वानखेडे यांची बदली डीआरआयमध्ये करण्यात आली आहे. वानखेडेंना सोमवार ३ जानेवारी २०२२ रोजी रिपोर्ट करावे लागणार आहे. वानखेडे यापूर्वीसुद्धा डीआरआयमध्येच होते. डीआरआयमधून त्यांना एनसीबीमध्ये नियुक्त करण्यात आले होते. एनसीबीमध्ये वानखेडेंचा कार्यकाळ बराच चर्चेत राहिला आहे.

एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची एनसीबीमधून डीआरआयमध्ये बदली करण्यात आली आहे. वानखेडे यांना यापूर्वी डीआरआयमधून एनसीबीमध्ये नियुक्त करण्यात आले होते. तसेच त्यांना झोनल डायरेक्टर करण्यात आले होते. यानंतर आता पुन्हा वानखेडेंची डीआरआय म्हणजेच केंद्रीय सीमा उत्पादन शुल्क खात्यात बदली (Directorate of Revenue Intelligence) करण्यात आली आहे. वानखेडेंचा एनसीबीमधील कार्यकाळ यापूर्वीच संपला होता. त्यांच्या सेवेत मुदतवाढ करण्याबाबत विचार सुरु होता. यामुळे निर्णय घेण्यास विलंब झाला होता. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

महाराष्ट्रातील भाजप नेते एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या बदलीबाबत दिल्लीत लॉबिंग करत होते. वानखेडेंना एनसीबीमध्येच ठेवण्यासाठी भाजपमधील नेते प्रयत्न करत होते. यामुळेच वानखेडेंच्या बदलीबाबत निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर केंद्रातून समीर वानखेडे यांची डीआरआयमध्ये बदली केली असल्याची माहिती समोर आली आहे.

डीआरआयमध्ये अद्याप पद नाही 

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची डीआरआयमध्ये बदली करण्यात आली असली तरी त्यांच्यावर कोणती जबाबदारी असेल त्याची अद्याप माहिती देण्यात आली नाही. तुर्तास समीर वानखेडे यांना डीआरआयमध्ये साइड पोस्टिंग ठेवण्यात आले आहे.


हेही वाचा : एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपला, काय आहे वानखेडेंची कारकीर्द?

First Published on: January 3, 2022 3:07 PM
Exit mobile version