बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या ७३ जणांवर कारवाई

बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या ७३ जणांवर कारवाई

जळगावमध्ये वाळू माफियांवर कारवाई

१८ लाख रुपयांचा दंड
भीमा व माण नदीतून बेकायदा वाळू उपसा करून शासनाच्या मालमत्तेची लूट केल्याप्रकरणी महसूल खात्याने ७३ लोकांच्या मालमत्तेवर १८ लाख ३३ हजार रुपयांचा दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.
मंगळवेढा तालुक्यातून भीमा व माण या नद्या प्रामुख्याने वाहत आहेत. भीमा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्याने शासनाच्या मालमत्तेची आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची लूट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तहसीलदार अप्पासाहेब समिंदर यांच्या पाहणीत तामदर्डी, ताडोर, गुंजेगाव, मारापूर, घरणिंकी येथे वाळू तसेच येळगी, मरवडे येथे दगड व मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी ७३ लोकांना दंडात्मक कारवाईच्या नोटीसा संबंधित सज्जेच्या तलाठ्यांमार्फत बजाविण्यात आल्या होत्या. यात १८ लाख ३३ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.
नोटीस बजावूनही वाळू तस्करांकडून दंड भरण्यास प्रतिसाद न मिळाल्यामुळे महसूल प्रशासनाने संबंधितांच्या मालमत्तेवर दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे सांगण्यात आले. भीमा नदीच्या पात्रात नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाहाबरोबर वाळू साठा झाला आहे. ही वाळू चमकदार व बारीक असल्यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई, पुणे येथून या वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

First Published on: May 22, 2018 9:51 AM
Exit mobile version