प्रमाणपत्रावरून संदीप देशपांडेंची शिवसेनेवर टीका, केले व्यंगचित्र ट्वीट

प्रमाणपत्रावरून संदीप देशपांडेंची शिवसेनेवर टीका, केले व्यंगचित्र ट्वीट

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसैनिकांना आता एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. यावरून रविवारी संदीप देशपांडे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे मी हिंदुत्व सोडणार नाही असे लिहून देणार का? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला होता. त्यानंतर आज पुन्हा संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले आहे.

ट्विटमध्ये नेमके काय आहे – 

या ट्विटमध्ये संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर प्रमाणपत्रांवरून निशाणा साधला होता. आज पुन्हा एकदा त्यांनी एक व्यंगचित्र ट्विटरवर पोस्ट केले आहे. या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसैनिकांनी दिलेले प्रतिज्ञापत्र आहे. दुसरीकडे टीव्ही चालू आहे, ज्यामध्ये एकनाथ शिंदे हे आम्ही म्हणजेच खरी शिवसेना असा दावा करताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या हातात जीपीएस ट्रॅकर असून ते उद्धव ठाकरे यांना म्हणत आहे की बाबा मला एक आयडीया सूचली आहे. आपण शिवसैनिकांना शिवबंधन आणि प्रतिज्ञापत्राऐवजी जीपीएस ट्रॅकरच बांधुयात का? असे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.

शिवसैनिकांना द्यावे  लागणार प्रतिज्ञापत्र –

40 पेक्षा अधिक आमदार आणि 8 मंत्री शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडले. त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. एकाचवेळी एवढ्या मोठ्यासंख्येने आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे  शिवसेनेत फूट पडली असून दोन गट तयार झाले आहेत. यामुळे शिवसेनेने सावध पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता शिवसैनिकांना तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. या प्रमाणपत्रामध्ये माझा ठाकरे यांच्या नेत्वृत्वावर पूर्ण विश्वास आहे, असा मजकूर असणार आहे. शिवसेनेचे आमदार, नगरसेवक, शिवसैनिक, पदाधिकारी अशा सर्वांकडूनच हे प्रमाणपत्र घेतले जाणार आहे.

 

First Published on: July 4, 2022 9:32 AM
Exit mobile version