निर्बंध उठवा, अन्यथा सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील – संदीप देशपांडे

निर्बंध उठवा, अन्यथा सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील – संदीप देशपांडे

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. सर्वसामान्यांना लोकल सेवा बंद आहे. यामुळे नागरिक देखील त्रस्त आहेत. हाच मुद्दा पकडत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्यातील महाविकास आघाडीला सूचक इशारा दिला आहे. निर्बंध जर उठवले नाहीत तर त्याचे परिणाम हे सरकारला भोगावे लागतील, असं संदीप देशपांडे म्हणाले.

ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना निर्बंधातून बाहेर काढा ही आमची मागणी आहे. लसीकरण झालं तरी निर्बंध असतील, तर लसीकरणाचा उपयोग काय? सरकारला जनतेची पडली आहे की नाही? जनतेचे रोज हाल होत आहेत. सरकारला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत, असं संदीप देशपांडे म्हणाले. रेल्वे सुरु करण्यासंबंधी पत्र देखील लिहिलं आहे, पण त्यांना घरातच बसून राहायचंय, त्याला जनता काय करणार? असं संदीप देशपांडे म्हणाले.

मुख्यमंत्री मॅनेज करुन पास झाले असावेत

‘प्रश्नम’ या संस्थेने जाहीर केलेल्या त्रैमासिक अहवालात भारतातील १३ राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अव्वल ठरले आहेत. त्यावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, की “आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो अभ्यास करायचा नाही, पण तो वर्गात नंबर वन यायचा. एकतर तो खूप हुशार असेल किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला असेल, असंच मुंख्यमंत्र्यांचं आहे. नंबर एक असण्यासाठी काम करावं लागतं, दीड वर्षात काय केलं?” अशी टीका संदपी देशपांडे यांनी केली.

 

First Published on: July 15, 2021 10:33 AM
Exit mobile version