गुन्हेगारीमुक्त नाशिकसाठी संदीप कर्णिक घेताहेत तत्कालीन ‘सीपीं’च्या उपक्रमांचा आढावा

गुन्हेगारीमुक्त नाशिकसाठी संदीप कर्णिक घेताहेत तत्कालीन ‘सीपीं’च्या उपक्रमांचा आढावा

नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यावर तत्कालीन पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयांकडे दुर्लक्ष करण्याच्या कार्यपद्धतीला नकार दिला आहे. पोलीस आयुक्त कर्णिक यांनी गुन्हेगारीमुक्त नाशिकसाठी शहरातील कायदा-सुव्यस्थेसाठी तत्कालीन आयुक्तांच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची अंमलबजावणी अखंडित ठेवण्याची भूमिका घेतली आहे. तेे तत्कालीन पोलीस आयुक्तांचे निर्णय, उपक्रम आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठीच्या भूमिकांचा आढावा घेत आहेत.

नाशिक पोलीस आयुक्तलयात नवीन पोलीस आयुक्त आल्यानंतर आधीच्या पोलीस आयुक्तांच्या उपक्रमशील पोलिसिंग दुर्लक्ष करण्यत आल्याचे दिसून आले आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी गुन्हेगारांविरोधात कठोर धोरण अवलंबिले होते. एस. जगनाथन यांनी मैत्रेय फसवणुकीच्या गुन्हा दाखल करून तपास केला. त्यामुळे गुंतवणूकदारांना लाभ झाला. डॉ. रवींद्र सिंगल यांनी हेल्मेट सक्तीसह वाहतुकीसंदर्भात उपक्रमांवर भर दिला होता. विश्वास नांगरे-पाटील यांनी मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्ये पोलीस चौक्यांची निर्मिती केली. दीपक पाण्डेय यांनी हेल्मेट असेल तर पेट्रोल मिळेल असा उपक्रम राबविला. जयंत नाईकनवरे यांनी सप्तरंग रोड मॅपचा उपक्रम राबविला. तर अंकुश शिंदे यांनी गुन्हेगारीविरोधात पथके तयार केली. गत १० वर्षातील पोलिसिंगचे अनेक निर्णय सध्या अकार्यरत आहेत. त्यामुळे नवनियुक्त आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्याकडे लक्ष वेधले आहे. शहरातील माजी पोलीस आयुक्तांच्या संकल्पना व निर्णयांचा आढावा घेत त्यापैकी काही महत्त्वाचे निर्णय पुन्हा अंमलात आणले जाणार आहेत.

आधीच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्तांचे काही निर्णय, मोहीमा, उपक्रम महत्त्वपूर्ण आहेत. त्यांची सद्यस्थितीतील गरज ओळखून योग्य निर्णय होईल. जे निर्णय शहराच्या हिताचे आहेत, त्याची पुढेही अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
– संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त

First Published on: November 30, 2023 6:00 AM
Exit mobile version