राजकारणात संजय हे नाव खराब झाल्यामुळे बदलण्याचा प्रयत्न करणार, राऊतांच्या टीकेनंतर संजय कुटेंचे वक्तव्य

राजकारणात संजय हे नाव खराब झाल्यामुळे बदलण्याचा प्रयत्न करणार, राऊतांच्या टीकेनंतर संजय कुटेंचे वक्तव्य

बनावट विक्री योजनेद्वारे हजारो महिलांची कोट्यवधींची फसवणूक, आरोपीला अटक करण्याची संजय कुटेंची मागणी

राजकारणात संजय हे नाव खराब झाल्यामुळे माझं संजय हे नाव बदलण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य भाजप आमदार संजय कुटे यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत विश्व प्रवक्ते आहेत. खालच्या पातळीवर येऊ नये असेही संजय कुटे म्हणाले आहेत. कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात त्यामुळे तिथे आम्ही करु असे वक्तव्य कुटे यांनी केले होते. या वक्तव्याचा समाचार संजय राऊत यांनी घेतला होता. एका पक्षाच्या आणि विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना न्यायालयीन दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

भाजप आमदार संजय कुटे यांनी कोर्टातून बऱ्याच गोष्टी करता येतात तिथून आम्ही करु असे वक्तव्य केले होते. कुटेंच्या या वक्तव्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. यानंतर कुटेंनी प्रतिक्रिया देताना संजय हे नाव राजकारणात खराब झाल्यामुळे मी संजय नाव बदलण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान यावेळी कुटेंनी कोर्टाबाबतच्या वक्तव्यावरसुद्धा स्पष्टीकरण दिलं आहे. न्यायालयाबद्दल माझ्या वक्तव्याचा माध्यमांमध्ये विपर्यास करण्यात येत आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम राज्यातील पोलिसांकडून सुरु आहे. परंतु न्यायव्यवस्था ही सर्वोच्च आहे. न्यायालयात खऱ्या खोट्या गोष्टीला न्याय मिळतो यामुळे आम्ही न्यायालयात जातो असे संजय कुटे म्हणाले आहेत.

न्याय व्यवस्थेत दिलासा देण्यासाठी लोकं बसवलेत – राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार संजय कुटे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. राज्यात दिशा सालियान, मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरण ते विक्रांत घोटाळा करणाऱ्या आरोपींना दिलासा कसा मिळतो? न्यायव्यवस्थेवर कोणाचा दबाव आहे. आरोपींना दिलासा देण्यासाठी न्यायालयात विशेष लोकांना बसवले आहे का? ते कोणाच्या सूचनेने काम करत आहे का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.


हेही वाचा : श्रीराम किंवा हनुमान आपले दैवतच असं पक्षातून विभागणं योग्य नाही, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य

First Published on: April 15, 2022 5:39 PM
Exit mobile version