…तर मविआ सरकारमधून बाहेर पडण्यास तयार, संजय राऊतांचं मोठं विधान

…तर मविआ सरकारमधून बाहेर पडण्यास तयार, संजय राऊतांचं मोठं विधान

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यास तयार असून, मुंबईत येऊन चर्चा करा, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत. संजय राऊतांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. पुढच्या 24 तासांत मुंबईत या, असं संजय राऊतांनी शिंदेंबरोबर गेलेल्या बंडखोर आमदारांना उद्देशून सांगितलं आहे.

जे आमदार महाराष्ट्राबाहेर आहेत, त्यांनी महाराष्ट्रात यावं. सोशल मीडियाच्या माध्यमातून भूमिका न मांडता प्रत्यक्ष मुंबईत या आणि उद्धव ठाकरेंना भेटा. तुमची भूमिका मांडा, तुमच्या भूमिकेचा विचार केला जाईल. मविआमधून बाहेर पडावं, यासाठी आधी मुंबईत या. आपण पक्के शिवसैनिक आहात. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे. आधी तुम्ही 24 तासात परत या. उद्धव साहेबांसोबत बसून भूमिका मांडा, असंही संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या आमदारांना ठणकावून सांगितलंय.


विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या तावडीतून सुटून आलेल्या दोन आमदारांवरची आपबितीही सांगितली आहे. कैलास पाटील आणि देशमुख यांची कहाणी थरारक आहे. त्यांचं अपहरण करून भाजपने त्यांना नेलं, त्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यांच्या ताब्यातील 21 आमदारांचा संपर्क आमच्याशी झालाय. तुम्ही कितीही फोटो, व्हिडिओ पाठवले तरी ज्यादिवशी ते मुंबईत येतील त्यातील 21 आमदार शिवसेनेबरोबर असतील, त्यांच्याशी ठाकरेंची चर्चा झाली आहे. विधानसभेतही महाविकास आघाडीचा विजय होईल, एवढा आकडा आमच्याकडे आहे, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.


हेही वाचाः वर्षा बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद, पण… शिंदेंकरवी शिरसाटांचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र

First Published on: June 23, 2022 2:50 PM
Exit mobile version