राष्ट्रवादीतील खेडच्या आमदारांना सत्तेची मस्ती, शरद पवारांना दोष देणार नाही – संजय राऊत

राष्ट्रवादीतील खेडच्या आमदारांना सत्तेची मस्ती, शरद पवारांना दोष देणार नाही – संजय राऊत

राष्ट्रवादीतील खेडच्या आमदारांना सत्तेची मस्ती, शरद पवारांना दोष देणार नाही - संजय राऊत

खेडमध्ये पहिली ठिणगी पडली आहे. खेडच्या आमदारांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. खेडमध्ये एका-मेकाची माणसे पळवली जात आहेत. राष्ट्रवादीच्या खेडमधील आमदारांना सत्तेची मस्ती आली आहे. या आमदारांना शरद पवारांच्या पक्षात राहायची लायकी नाही. अजित दादा आणि शरद पवार यांनी विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांना समजवावे अन्यथा शिवसेनाने बांगड्या घातल्या नाहीत असा इशाराच खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. खेडमधील शिवसैनिकांच्या पाठीशी शिवसेना नेहमी आहे असे सुतोवाच देखील संजय राऊत यांनी केले आहे. विद्यमान आमदाराला अजित पवार यांनी समजूत द्यावी असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.

आमदाराची राजकारण करण्यास लायकी नाही

स्वर्गीय सुरेश गोरे यांनी तत्कालीन आमदार असताना खेडमध्ये पंचायत समितीसाठी जागा ठरवली होती. सरकारकडून त्यांनी जागा मंजूर करुन शासकीय कारवाई पुर्ण झाली होती. या कामात त्यांचा आत्मा गुंतला होता परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सध्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी ती जागा बदलण्यासाठी जे घाणेरडे राजकारण केले ते निघृण राजकारण आहे. मृत्यूनंतर वैर संपावं तुलुक्यातली जागा इकडी तिकडे नेल्यामुळे काय फरक पडली परंतु आपल्या तालुक्यातील राजकारणातला सहकाऱ्याने निर्माण केलेलं कार्य आणि लोकांचा आग्रह असताना की जागा हलवू नका, गोरे यांची भावनिक गुंतवणूक त्या कार्यात होती. जर विद्यमान आमदारांना एवढी माणुसकी नसेल तर ते शरद पवारांच्या पक्षामध्ये राजकारण करण्यास लायक नाही आहेत असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ॉ

तिन्ही पक्षांचा समन्वय चांगला

शिवसेना खासदार संजय राऊत खेड दौऱ्यावर आहेत. खेडमध्ये आयोजित कार्यक्रमात संजय राऊत माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, खेडमध्ये ज्या राजकीय घटना घडत आहेत. या घटना तुम्हाला लहान वाटत आहेत परंतु या घटनांचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. या लहान घटना नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये तीन पक्षांची आघाडी आहे. काँग्रेस,शिवसेना राष्ट्रवादी आणि तिन्ही पक्षांचा समन्वय चांगला आहे. त्या स्तरावर वरच्या पातळीवर कुरघोडी, वाद अजिबात नाही आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे,बाळासाहेब थोरात, अजित पवार आहेत कुठेही गालबोट लागेल किंवा जे चांगले चालले आहे त्यात दुधात मीठाचा खडा पडेल असे अजूनतरी काहीही घडलेलं नाही आहे.

तीन पक्ष सोबत असले की भांड्याला भांडे लागते

परंतु वारंवार या घटना पुणे जिल्ह्याच्या आसपास विशेषतः खेडमध्ये घडताना दिसत आहेत. सुरुवातीला गांभीर्याने घेऊशा वाटल्या नाही. तीन पक्ष सोबत असले की भांड्याला भांडे लागते अधिच्या काळात देखील असेच भांड्याला भांडे लागत होती. परंतु शिवसेना- भाजप युतीचे सरकार होते तेव्हा दोघांमध्ये अलिखित करार होता. तो म्हणजे एकमेकांची माणसे फोडून सत्ता स्थापन करायची नाही. तेव्हा दोघांनाही संधी होती. कुठेही जेव्हा आसा काही प्रसंग निर्माण होईल तेव्हा एकमेकांना माहिती देऊन चर्चा करायची हा दोन पक्षांमध्ये तो करार होता आणि युती होती तोपर्यंत तो पाळला आहे.

आता तीन पक्षांचे सरकार आहे त्यामुळे आमची आपेक्षा आहे. आमच्यासारखेच इतरांचीही आपेक्षा असेल जिथे एखाद्या पक्षाची सत्ता आहे. मग ती पंचायत समिती का असेना ती सत्ता संपवण्यासाठी त्या पक्षाची माणसे फोडायची हे कोणत्याही आघाडी धर्मच्या नियमात बसत नाही पंरतु हे खेडमध्ये घडले आहे. याचं खापर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाही फोडणार, त्यांचे आमचे संबंध राजकीय आणि जिव्हाळ्याचे आहेत.

खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटिल हे पंचायत समितीच्या जागेवरुन घाणेरडे राजकारण करत आहेत. त्यांना माज आलाय अस म्हणाव लागेल. थोडीफार सत्ता आहे म्हणून माज करुन काहीही करु शकतो तर तसं नाही शिवसेना उत्तर देईल. खेडमध्ये पंचायत समितीच्या सदस्यांना पळवून नेले, दहशतीने पळवून नेले अविश्वास ठराव मंजूर करताना जो तमाशा करण्यात आला हे आघाडीच्या कोणत्या निती नियमात बसते हे जर आमदारांना माहित नसेल तर त्यांचे प्रमुख नेते आहेत त्यांच्यापर्यंत नेवू असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आम्हाला माणसं फोडता येतात ती फोडू शकतो

पंचायत समितीचा विषय हा आमच्यासाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. आम्हाला माणसं फोडता येतात ती फोडू शकतो. परंतु आम्ही नियमाने बांधलो गेलो आहोत त्यामुळे ते करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच शरद पवार यांची श्रद्धा आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ त्यांतर पुढे काय करायचं हे ठरवू मोहिते यांची वागणूक जर अशीच असेल तर पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असो की नसो इथे मात्र शिवसेनेचा उमेदवार असेल आणि आताचे दिलीप मोहिते पाटील यहे माजी आमदार असतील अशा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

अजित पवारांनी लक्ष द्यावे अन्यथा…

राष्ट्रवादी नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार मोहिते पाटील यांच्याकडे लक्ष द्यावे. शिवेसनेचे पंचायत समितीचे सदस्य पळवून नेल्याच्या प्रकारावर संजय राऊत यांनी अजितदादांना आवाहन केले आहे. अजित पवारांना शक्य होणार नसेल तर त्यांनी शिवसेनेकडे सोपवावे शिवसेना काय ते बघून घेईल असे शिवेसेना खासदा संजय राऊत यांनी म्हटले आहे.

First Published on: June 4, 2021 4:42 PM
Exit mobile version