बाळासाहेबांनी उभं केलं, तर शरद पवार आधारस्तंभ; संजय राऊत

बाळासाहेबांनी उभं केलं, तर शरद पवार आधारस्तंभ; संजय राऊत

संग्रहित छायाचित्र

अहमदनगरः बाळासाहेबांनी मला उभं केलं, मोठ केलं,  पण शरद पवार हे माझ्यासाठी आधारस्तंभ आहेत. शरद पवार यांना मी लपून छपून भेटत नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत सांगतिले.

अहमदनगर येथे संजय राऊद यांची मुलाखत घेण्यात आली. त्यात संजय राऊद म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच शरद पवार यांना माझ्या आयुष्यात स्थान आहे. सन २०१९ ला विधानसभा निवडणुकीचे निकालही पूर्ण लागले नव्हते. तेव्हा मी शरद पवार यांना सिल्व्हर ओकवर जाऊन भेटलो होतो. सत्ता स्थापन करायला आलो आहे, असं त्यांना सांगितलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी स्पष्टचं सांगितलं होतं की आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. त्यामुळे आम्ही काही लपवलेलं नाही.

सन २०१९ ला आम्ही भाजपसोबत निवडणूक लढवली असली तर आमचा घटस्फोट २०१४ मध्येच झाला होता. युती भाजपने तोडली. आम्ही नाही. निवडणुकी आधीचा फार्मुला निवडणुका झाल्यानंतर भाजपने नाकारला. कारण त्यांनी जास्त जागा जिंकल्या होत्या. त्यांनी आमच्या काही जागाही पाडल्या होत्या, असा खुलासा संजय राऊत यांनी केला.

भाजपचं हिंदुत्व हे बोगस हिंदुत्व आहे. ते चोरलेल्या हिंदुत्वावर निवडून आले आहेत. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे घोषित आहे. त्यांना ती पदवी दिलेली आहे. इराणमध्ये अयोतुल्ला खोमोनी इस्लाम धर्माचं राज्य घेऊन आला आणि इथे बाळासाहेब हिंदुत्वाचा आवाज उठवत होते. पण त्यावेळी बाळासाहेबांनी सांगितले की, मी नक्कीच हिंदुत्वाचा विचार घेऊन आलो. परंतु हा देश एक राहिला पाहिजे, मला हिंदुंचा खोमेनी व्हायचं नाही. आता तुम्ही धर्मावर आधारित राष्ट्र तयार करत आहात. परंतु धर्मावर उभी राहिलेली राष्ट्र टिकत नाहीत. पाकिस्तान, बांगलादेश, सिरिया, इराक, इराण, अफगाणिस्तान ही त्याचीच उदाहरणे आहेत. अफगाणिस्तानमध्ये तर तालिबान्यांचे राज्य आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, आताच्या घडीला धनुष्यबाण, शिवसेना नाव जरी उद्धव ठाकरेंसोबत नसले तरीदेखील लोक आमच्यासोबत आहेत. ठाकरे हा ब्र‌ॅंड आहे त्यांचं नावचं पुरेसं आहे. असं म्हणत राऊत यांनी निवडणुका घेण्याचे आव्हान दिले आहे.

First Published on: April 7, 2023 5:45 PM
Exit mobile version