‘पवारांचं कर्तृत्व त्यांच्या प्रवासातील मोठा अडथळा ठरलं’

‘पवारांचं कर्तृत्व त्यांच्या प्रवासातील मोठा अडथळा ठरलं’

“पवारांवर काँग्रेसने अन्याय केलाय, शरद पवार हे देशातले गेल्या २५ वर्षांपासूनचे असे नेते आहे, ज्यांना पंतप्रधानपदाची संधी आधीच मिळायला पाहिजे होती. आज त्यांचे वय ८० झाले आहे. असे मोठे नेते लोकांमध्ये राहणारे, ते वयाच्या बंधनात अडकून पडत नाही. वयाच्या बेड्या त्यांना थांबवत नाहीत. ते धावत असतात, पळत असतात. देशाचे नेतृत्व करण्याची सर्वात जास्त क्षमता असलेले नेते कोणते असतील, सध्याच्या काळात, तर फक्त शरद पवार आहेत. पण, शरद पवारांचे कर्तृत्व हे त्यांच्या प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरलं. कमी कुवतीच्या लोकांना शरद पवारांच्या कर्तृत्वाची कायम भीती वाटत आली. म्हणून उत्तरेकडील नेत्यांनी शरद पवारांना कायम अडथळ्यात टाकण्याचे काम केले. शरद पवार केव्हाच पंतप्रधान व्हायला हवेत होते. पण होऊ द्यायचे नाही, या एका द्वेषापोटी शरद पवारांना कायम रोखण्यात आले,” असे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली.

मुंबई महापालिकेत शिवसेना पहिला पक्ष

नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. “प्रमुख महापालिकांमध्ये एकत्र निवडणुका लढल्यास चांगले निकाल लागतील. त्यासाठी आम्ही एकत्र बसू, निर्णय घेऊ. आता मुंबई महापालिकेत शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. नाशिकमध्ये आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत. पण, महाविकास आघाडीच्या अनुषंगाने विचार केल्यास तर आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत. सगळ्यांचा सन्मान राखून एकत्र निवडणुका लढवाव्यात असा विचार सुरू आहे,” असेही राऊत यावेळी म्हणाले.

मनसे-भाजपा युतीच्या चर्चेवर राऊत म्हणाले…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजपा युती करणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. चर्चेवर भाष्य करताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावला. तर भाजपाने मिशन मुंबई सुरू केले असल्याचा आणि मनसे भाजपासोबत जाण्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले, ‘आता हैदराबादमध्ये त्यांना ओवेसी मिळाले. मुंबईत कुठल्या पक्षातून ते ओवेसी निर्माण करतात, ते बघावं लागेल,’ असे राऊत म्हणाले. मनसे-भाजपा युतीच्या चर्चेवर राऊत म्हणाले,’जाऊद्या ना, कुणीही कुणाबरोबर गेलं, तरीही मुंबई महापालिका ही शिवसेनेकडेच राहिल. सध्याच्या स्थितीत काहीही बदल होणार नाहीत. मी नाशिकलाही आता बोलतोय की, पुढचा नाशिकचा महापौर शिवसेनेचाच असेल,’ असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

 

 

First Published on: December 12, 2020 1:37 PM
Exit mobile version