नागपुरात पुढचा महापौर शिवसेनेचाच असणार; संजय राऊतांनी भरली कार्यकर्त्यांमध्ये उर्जा

नागपुरात पुढचा महापौर शिवसेनेचाच असणार; संजय राऊतांनी भरली कार्यकर्त्यांमध्ये उर्जा

नागपूर महानगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनने कंबर कसली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुढचा नगरसेवक हा शिवसेनेचाच होणार, असा दावा करत शिवसैनिकांमध्ये उर्जा भरली. शिवसेनेला संपवण्याची ताकद कोणामध्ये नाही. नागपूरमधील कितीही मोठे नेते येऊद्यात, त्यांना पुढी २५ वर्ष विरोधातच रहायचं आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेच्या निवडणुकीची तयारी करायला सुरुवात करा, घराघरात पोहोचा आणि सर्वांना सांगा पुढचा महापौर हा शिवसेनेचाच असेल, असं संजय राऊत यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना म्हटलं.

दक्षिण नागपूरमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राऊतांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचार लवकरच बाहेर काढणार असल्याचे संकेत देखील राऊत यांनी दिले. इथल्या थापा खूप झाल्या. आता फसवणूक होऊ देणार नाही. शिवसेनेच्या महिला आघाडीला रणरागिणी म्हणतात. त्या आता नागपूर महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. मग त्यांना कळेल शिवसेना काय आहे, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता टोला लगावला. जे स्वत:ला नागपूरकर म्हणतात ते मुंबईकर झाले आहेत. त्यांच्या प्रॉपर्ट्या मुंबईत आहेत. त्यांनी नागपूरला वाऱ्यावर सोडलं आहे, असं राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना नागपुरात आल्यावर सुबुद्धी येईल असं म्हटलं होतं. त्या वक्तव्याचा देखील राऊतांनी समाचार घेतला. हे दंगली कसे घडवतात आणि नंतर हे कसे पळून जातात आम्ही बघितलं आहे. अयोध्येत मशीद पाडण्यात शिवसेनेचे वाघ होते, हे बाळासाहेबांनी सांगितलं. नागपूरच्या विमानतळावर उतरलो आणि सरळ इकडे आलो. हल्ली नागपूरचे लोक मुंबईत राहतात, असा राऊतांनी लगवाला. पुढे बोलताना राऊत म्हणाले, फडणवीस म्हणाले नागपूरची माती अशी आहे की सुबुद्धी मिळते. खरं आहे! पण नागपुरात राहून तुम्हाला सुबुद्धी आली नाही. म्हणून तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं. शिवसेनेसोबत होते, सत्तेत होते. मात्र, तसं झालं नाही. वीट यावं अशा काही गोष्टी नागपुरातून घडतात, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली.

 

First Published on: April 22, 2022 10:52 AM
Exit mobile version