२०२४ मध्येही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार – संजय राऊत

२०२४ मध्येही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार – संजय राऊत

भाजप नेते कोणत्या नशेत बोलतात हे तपासावं लागेल; शिवसेनेचा खोचक टोला

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी २०२४ मध्ये उद्धव ठाकरेच राज्याचे मुख्यमंत्री असतील असा दावा केला आहे. राऊत पुण्यातील वडगाव शेरी येथे बोलत होते. यावेळी त्यांनी पुणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडवकवण्याची वेळ आली आहे. बाळासाहेबांचं पुण्यावर खूप प्रेम होतं. मुंबईनंतर सर्वाधिक जास्त काळ त्यांनी पुण्यात घालवला. त्यामुळे पुणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता यायला पाहिजे, असं आवाहन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केलं.

संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी २०२४ मध्येही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार असा दावा करताना ज्या पुण्याची जमीन छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर लावून नांगरली, त्या पुण्यात शिवसेनेला संधी कधी मिळणार, असंही त्यांनी उपस्थितांना विचारलं.

भांडं लागायला नको असेल तर १५० जागा निवडून आणा

युती होईल, महाविकास आघाडी होईल. सन्मानाने जागा वाटप झालं तर आपण एकत्र लढू, असं सांगतानाच युती, महाविकास आघाडीमध्ये भांड्याला भांड लागणार. हे नको असेल तर १५० जागा निवडून आणा. जो पर्यंत ते होत नाही तोपर्यंत गोड मानून घ्या, असं राऊत म्हणाले.

शिवसेना ही आग आहे

शिवसेना जातपात न मानणारा पक्ष आहे. तसंच महाराष्ट्र आणि देश एकच आहे. या भावनेतून बाळासाहेबांनी राजकारण केलं. त्यांचा तोच वारसा आम्ही पुढं नेतोय. पक्ष महत्वाचा आहे, पद नाही, असंही राऊत म्हणाले. मंत्रीपदं येतात आणि जातात, मग लोकं मला माजी म्हणू नका, असं म्हणतात, असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. तसेच शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, शिवसेना ही आग आहे. शिवसेना हा लंबी रेसचा घोडा आहे, असंही राऊत म्हणाले.

 

First Published on: September 26, 2021 7:27 PM
Exit mobile version