न्यायव्यवस्था किती दबावाखाली आहे; संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

न्यायव्यवस्था किती दबावाखाली आहे; संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात न्यायालयीन दिलासा कोणाला मिळणार याचा निकाल उद्या ११ जुलै रोजी स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. देशामध्ये लोकशाही आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की नाही? हे उद्या कळेल, असे त्यांनी म्हटले. (sanjay raut says is democracy and justice independent in this country will know tomorrow)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बौठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी ते म्हणाले की, या देशामध्ये लोकशाही आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की नाही, हे उद्या कळेल. न्यायव्यवस्था किती दबावाखाली आहे, हे सर्वांना माहीत आहे. कायदेशीर लढाईत शिवसेना कुठेही कमी पडणार नाही. आम्हाला माहीत आहे, न्याय व्यवस्था किती दबावात आहे, पण न्याय होईल”, असे राऊत यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना नेत्यांकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीका करण्यात आली. विशेष म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या आमदारांच्या बंडाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांच्यावर टीका करण्यात सुरूवात केली होती. दरम्यान, आता शिवसेनेला सुरुंग लावल्यानंतर दोन्ही बाजूकडून कायदेशीर लढाई सुरु झाली आहे.

शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटाकडून एकमेकांचा व्हीप उल्लंघन तसेच तसेच 16 आमदार आमदार अपात्रतेची कारवाई आणि सत्तांतराला देण्यात आलेले आव्हान या सर्व बाबींवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.


हेही वाचा – शिवसेना आणि शिंदे गटाच्या आमदारांना नोटिसा, 7 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

First Published on: July 10, 2022 3:51 PM
Exit mobile version