Sanjay Raut : पैसे घेऊन भ्रष्टाचाऱ्यांना अभय, राऊतांचा भाजपावर आरोप

Sanjay Raut : पैसे घेऊन भ्रष्टाचाऱ्यांना अभय, राऊतांचा भाजपावर आरोप

पैसे घेऊन भ्रष्टाचाऱ्यांना अभय, राऊतांचा भाजपावर गंभीर आरोप

मुंबई : आजवर भाजपाने विरोधातील अनेक नेतेमंडळींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. पण त्याच भ्रष्टाचाऱ्यांना स्वतःच्या पक्षामध्ये सहभागी करून घेतल्याने विरोधकांकडून याच मुद्द्यावरून भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाने तुरुंगात असलेल्या भ्रष्टाचाऱ्यांना पैसे घेऊन बाहेर काढल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे भाजपा पैसे घेऊन भ्रष्टाचाऱ्यांना अभय देत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Sanjay Raut serious allegations against BJP regarding corrupt officials)

आज मंगळवारी (ता. 16 एप्रिल) प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्यांच्यावर भाजपाने, पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच स्वतःच्या पक्षामध्ये सहभागी करून घेतले. त्यामुळे या भ्रष्टाचाऱ्यांचे पंतप्रधान मोदी समर्थन करतात का?, चंदा द्या, नाही तर तुमच्यावर कारवाई करणार, अशी भाजपाची निती आहे. जे तुरुंगात आहेत, त्यांना सोडविण्यासाठीही भाजपाने पैसे घेतले आणि पंतप्रधान मोदी त्यांचेच समर्थन करत आहेत. त्यांना याबाबत विचारले तर ते म्हणतात की मी चुकीचे काय केले? त्यामुळे पंतप्रधानांकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हतीच, असा हल्लाबोलच राऊतांकडून करण्यात आला.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : उडवाउडवीची उत्तरे नको, पीयूष गोयल यांना सचिन सावंतांनी सुनावले

पंतप्रधानांचे सर्व भाषण स्क्रिप्टेड…

काल सोमवारी (ता. 15 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला मुलाखत दिली. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, ती मुलाखत देखील स्क्रिप्टेड होती. पंतप्रधानांचे संसदेतील भाषण असो, बाहेर सभेतील भाषण असो किंवा कोणत्या शासकीय संस्थेला दिलेली मुलाखत असो, सर्व काही स्क्रिप्टेड असते. त्यात नवीन कोणतीच गोष्ट नाही. फक्त त्यांनी ज्या चुका केल्या आहेत, त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी पंतप्रधान मोदी मुलाखत देत असल्याचा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

तर, इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याची भारतीयांची भावना आहे. सुप्रीम कोर्टानेही हा घोटाळा असल्याचेच सांगितले आहे. त्याचेच समर्थन करण्यासाठी आणि घोटाळा नसल्याचे सांगण्यासाठी पंतप्रधान मोदी मुलाखत देत आहेत. त्यामुळे आता या गोष्टीवरून काय करू शकतो, अशी टीका संजय राऊतांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : …तर सांगेन आमचं ठरलंय जा, महायुतीच्या पुढाऱ्यांनी अपशकून करु नये; नारायण राणे आक्रमक


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 16, 2024 10:49 AM
Exit mobile version