केंद्राकडून राज्यातील राजकारण बिघडवण्यासह दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप

केंद्राकडून राज्यातील राजकारण बिघडवण्यासह दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रातील राजकारण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. यंत्रणांच्या सहाय्याने दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच पुणे भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त करु अशी घोषणाबाजी केली होती पंरतु पुण्यातील परिस्थिती कायम असल्याचा टोला भाजपला लगावला आहे. तर आगामी निवडणूक लढवून पुण्यात सत्ता स्थापन करु असा विश्वासही संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच सत्ता आल्यावर महापालिका कशी चालवायची असते हे दाखवून देऊ असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी संवाद साधला आहे. संजय राऊतांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रातील राजकारण बिघडवलं जात आहे. दहशत निर्माण केली जात आहे. दहशतीची एक पद्धत सुरु आहे ती फार काळ चालत नाही यापुर्वी देशामध्ये असे अनेक प्रसंग आले आणि गेले आहेत. अशा प्रकारचे यंत्रणा वापरुन दहशती निर्माण करणाऱ्या नेत्यांचे नामोनिशाण देशामध्ये संपलं आहे. या सगळ्या तपास यंत्रणा हा या देशाची ताकद नष्ट करण्याचा प्रकार आहे. प्रतिष्ठा घालवत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

महापालिका कशी चालवायची दाखवू

राज्यात अनेक शहरांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये का नाही. पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता आणण्यासाठी आणि शिवसेनेचा नगरसेवक बसवण्यासाठी शिवसैनिक कामाला लागले असून यावेळी आम्ही बसवणार असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त अशा घोषणा पाच वर्षांपुर्वी देण्यात आल्या होत्या परंतु भ्रष्टाचारमुक्त भयमुक्त पिंपरी चिंचवड झाले नाहीच. हा राक्षस उलट जास्त वाढताना दिसतो आहे. त्यामुळे भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त हाच मुद्दा घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक शिवसेना लढवणार आहे. महापालिका कशी चालवायची, शहर कसं राखायचे आणि लोकांना सुरक्षा कशी द्यायची हे दाखवून देऊ असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

First Published on: July 9, 2021 2:37 PM
Exit mobile version