खरा हिंदुत्ववादी कोण असता तर त्याने जीणावर गोळ्या झाडल्या असत्या, संजय राऊतांचे वक्तव्य

खरा हिंदुत्ववादी कोण असता तर त्याने जीणावर गोळ्या झाडल्या असत्या, संजय राऊतांचे वक्तव्य

खरा हिंदुत्ववादी कोण असता तर त्याने जीणावर गोळ्या झाडल्या असत्या. गांधींना का गोळ्या झाडल्या असत्या. पाकिस्तानची जीणाची मागणी होती. अस वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. महात्मा गांधींच्य पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या ट्वीट बोलताना राऊत म्हणाले की, जर खरा हिंदुत्ववादी कोण असता तर त्याने जिनाला गोळी मारली असती. गांधींवर का गोळ्या झाडल्या असत्या. पाकिस्तानची मागणी तर जिनांनी केली होती. मर्दानगी होती, तर गांधींना का मारलं, जिनांना का मारलं नाही, असा सवालही राऊतांनी केला आहे.

वेगळ्या पाकिस्तानची मागणी जिनांनी केली होती. जर गोळी मारणाला खरा हिंदुत्वावादी होता आणि त्याच्यात हिम्मत होती, तर फाळणीला कारणीभूत असलेल्या जिनांवर गोळी झाडायला हवी होती, निशस्त्र गांधींना का गोळी झाडण्यात आली होती. गांधींच्या काही भूमिकांवर टीका होऊ शकते, त्यांच्यावर होऊ शकत नाही, क्रांतीकारक म्हणून त्यांचं योगदान असामान्य होतं. कोणताही राष्ट्रभक्त गांधींवर गोळ्या झाडूच शकत नाही,” असं राऊत म्हणाले.

उत्तरप्रदेश निवडणुकांपूर्वीच भाजप -शिवसेनेत वॉर पाहायला मिळतेय. यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजही उत्तर प्रदेश निवडणुकांवरून भाजपावर टीकास्त्र डागले आहे. “भाजपाला आमच्या हिंदुत्वाची भीती, ते जे करताहेत ते भविष्यात नक्कीच महागात पडेल” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

राऊत पुढे म्हणाले की, “उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना उमेदवाराने वेळेत सर्व कागदपत्र दिले असतानाही त्याचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. तेथील निवडणूक अधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यावर सुनावणी करण्यास तयार नाही याचा अर्थ भाजपच्या दबावामुळे हे सर्व होत आहेत.” भाजपा शिवसेना घाबरते असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

“भाजपला आमच्या नवं हिंदुत्वाची भीती”

“ही लोकशाही नाही, निवडणुका भीतीदायक नसाव्या, आमच्या उमेदवारांना धमकावलं जातंय. शिवसेनेच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी धमकावण्यात आले आहे. त्यांना आमच्या नवं हिंदुत्वाची भीती आहे. पण आता ते जे करताहेत ही गोष्ट महागात पडणार आहे.” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

“उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये शिवसेना निवडणूक लढतेय. मात्र आत्तापर्यंत आमच्या 6 ते 7 उमेदवारांचे अर्ज बेकायदेशीरपणे रद्द करण्यात आले आहे, फेटाळण्यात आले. वेळेत नामांकन दाखल केले त्यांची पावती आहे. माझ्याकडे याचे पुरावे आहेत की ३ वाजेआधी अर्ज दाखल करण्यात आला होता, तरीही आमच्या उमेदवारांचे अर्ज रद्द केले.
तरीही तिथल्या जिल्हा दंडाधिकाऱ्याने नोएडा, बिझनूरमधील उमेदवारांचे अर्ज रद्द केले. ते अशाप्रकारच्या चुका दाखवतात जसे काही त्यांनी भाजपाची मत्तेदारी घेतली आहे. भाजपाचे अर्ज चुकासहीत स्वीकारले. गोव्यातही असाच प्रकार सुरू आहे. एकतर आमच्यामुळे त्यांचा पराभव होईल, किंवा आम्ही जिंकू, या कारणांनेच उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला आमची भीती वाटतीये,” असा दावा संजय राऊत यांनी केला.

“भाजपाला आमची भीती वाटतीये”

“ज्याप्रकारे शिवसेनेला उत्तर प्रदेशसह अनेक भागांमध्ये लोकांचे समर्थन मिळतेय ते पाहून एकतर आमच्यामुळे त्यांचा पराभव होईल, किंवा आम्ही जिंकू, या कारणांनेच भाजपाला आमची भीती वाटतेये. या भीतीपोटी नोएडापासून बिझनोर , पश्चिम मेरठ येथे शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले. असही राऊत म्हणाले.

“उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचं राज्य आहे असं गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते, यावरूनही राऊतांनी निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले की, “देशाच्या गृहमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचीच कायदेशीर भाषा बोलली पाहिजे. देशात कायद्याचे राज्य आहे किंवा नाही. आणि नसेल तर ती त्यांची जबाबदारी आहे. तुम्ही गृहमंत्री आहात, पंतप्रधान आहात अजून कुठेल मंत्री आहात तुम्ही कायद्याची भाषा करा. दिल्लीत निवडणुक आयुक्तांना भेटणार आमच्याकडील सर्व पुरावे दाखवणार ते जर ऐकायला तयार नसतील तर बघू काय करायचे ते, पण हे ठरवून झालेलं आहे.” अशी टीकाही राऊत यांनी केली.

“शिवसेनेला उत्तर प्रदेशमध्ये पाय ठेऊ द्यायचा नाही”

“शिवसेनेला उत्तर प्रदेशमध्ये पाय ठेऊ द्यायचा नाही. आमच्या उमेदवारांवर दबाव आणायचा, धमक्या द्यायच्या, अर्ज मागे घ्यायला लावायचा, आणि जर ऐकले नाही तर निवडणुक अधिकारी तिकडचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकाराचा बेकायदेशीर वापर करुन उमेदवारांचे अर्ज रद्द करायला लावले आहेत. ही भीतचं आहे.” असही राऊत म्हणाले.

“हा तर अंधा कानून आहे”

“गृहमंत्री म्हणतात ना कानून का राज.. हा तर अंधा कानून आहे. हा अंधा कानून काय असतो आम्ही सुद्धा दाखवतो. जीएसटीच्या पैशांसंदर्भात विचारणार आहोत. कायद्याचे राज्य आहे तर आमच्या महाराष्ट्राचा पैसाही परत करायला हवा.

“जो तो आपल्या गरजेनुसार एकमेकांचा हात पकडत असतो”

भाजप आम्हाला आठवण करुन देत आहेत. पण भाजपलाच विसरण्याचा आजार आहे. राजकारण बहुतांश लोकांना विसरण्याचा आजार आहे. आपली मर्यादा विसरून जातात. वारंवार आम्हाला आठवून करुन दिली जातेय की, आमच्यामुळे तुम्ही, आमच्यामुळे तुम्ही…. कुणी कोणामुळे नसतं… जो तो आपल्या गरजेनुसार एकमेकांचा हात पकडत असतो, एकमेकांना त्याची मदत होते. आम्ही त्यांना आठवण करुन दिली आम्ही काय आहोत.. शिवसेना काय आहे, बाळासाहेब ठाकरे काय आहे, उद्धव ठाकरे काय आहेत. काहींना विसरण्याचा आजार असतो अशांना थोडा धक्का द्यावा लागतो मग त्यांना आठवतं…आता त्यांना आठवले.. आणि अजूनही नाही आठवलं तर अजूनही धक्के देऊ.

 


 

 

First Published on: January 30, 2022 10:56 AM
Exit mobile version