महाराष्ट्रातही भाजपचे मुख्यमंत्री, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

महाराष्ट्रातही भाजपचे मुख्यमंत्री, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत आहे. यावर सातत्याने दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांचा डाव रंगतोय. याच प्रश्नावर बोलताना आज खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातही भाजपचे मुख्यमंत्री असल्याचा टोला लगावला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांनी मध्यस्ती करावी लागले, दोन्ही राज्यात भाजपचे सरकार आहे, महाराष्ट्रातही भाजपचे मुख्यमंत्री आहे, अशा शब्दात राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे.

कर्नाटकात पूर्णपणे भाजपचे राज्य आहे. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणतात अमित शाहांना भेटून काही फायदा नाही, कर्नाटकमधील भाजपचेच मुख्यमंत्री म्हणतात की, अमित शाहांना भेटून काही फायदा नाही, पण आम्ही सांगतो की, ते अमित शाह गृहमंत्री असल्याने त्यांना भेटून फायदा आहे, असंही राऊत म्हणाले.

कर्नाटकात सेंट्रल फोर्स पाठवा

हा संपूर्ण भाग केंद्रशासित करण्याचा अधिकार पूर्णपणे गृहमंत्र्यांना आहे. सीमा भागातील बेळगाव, कारवारसह, निपाणी, भालकी आणि 56 गावं आहेत तिथे कर्नाटकचे पोलीस धुडगूस घातलत आहेत. तिथे राज्य पोलीस दलाचा फौज फाटा काढून केंद्री तिथे सेंट्रल फोर्स पाठवू शकतात. हे केंद्रीय गृहमंत्रीच करू शकतात. त्यांनी ते करावं, अशी मागणीही राऊतांनी केली आहे.

त्यानंतर भाषेसंदर्भात जे आयोग आहेत, ज्याला अल्पसंख्याक आयोग म्हणतो त्या कर्नाटकातील संपूर्ण भागात मराठी वर्ग अल्पसंख्याक गटात येतात. त्यासंदर्भात केंद्राला पूर्णपणे निर्णय घेण्याची आणि मराठी भाषा, मराठी संस्कृती अधिकार वाणीने आदेश देण्याचे अधिकार हे गृहमंत्र्यांना आहेत. त्यामुळे गृहमंत्र्या खरंच मध्यस्थी करत असतील आणि त्यातून काही सकारात्मक निर्णय होणार असेल तर त्यावर टीका करण्याचे काही कारण नाही, असही राऊत म्हणाले.

सीमाचे रक्षण करण्याची जबाबदारी आत्ताच्या सरकारची

300 चिनी सैन्य तैवानमध्ये घुसले त्यांना परत पाठवले परंतु वारंवार चीन सैन्य भारतात घुसण्याचा प्रयत्न करतायत त्याचे खापर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर फोडले जात आहे. गेल्या 8 वर्षांपासून तुमचं सरकार आहे. खापर फोडण्यापेक्षा आपण काय करु शकतो हे पाहावं. सीमाचे रक्षण करण्याची जबाबदारी आत्ताच्या सरकारची आहे, असं म्हणत राऊतांनी केंद्रातील मोदी सरकारला सुनावले आहे.


राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, पण सीमाप्रश्नाबाबत तारखांवर तारखा; राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

First Published on: December 14, 2022 11:00 AM
Exit mobile version