आमदारांची यादी मिळाली म्हणजे भुतानं पळवली नाही, राज्यपालांनी सही केल्यास पेढे वाटू – संजय राऊत

आमदारांची यादी मिळाली म्हणजे भुतानं पळवली नाही, राज्यपालांनी सही केल्यास पेढे वाटू – संजय राऊत

राज्यपानियुक्त १२ नामनिर्देशित आमदारांच्या नावांची यादी अखेर राजभवनात सापडली असल्याचे सागण्यात येत आहे. मागील दोन दिवसांपासून या आमदारांच्या नावांच्या फाईलवरुन राज्यात हायव्होल्टेज ड्रामा सुरु होता. फाईल सापडत नसल्याच्या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात टीकांची झोड सुरु होती. परंतु राजभवनातून १२ आमदारांची यादी मिळाली असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. फाईल मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु त्या फाईलवर राज्यपाल सही करतील तेव्हा संपुर्ण राजभवनाला आम्ही पेढे वाटू असा खोचक टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच राज्यपालांनी थोडं गतीमान काम करावे अशी टीकाही संजय राऊतांनी केली आहे.

राजभवनातू फाईल मिळाल्याच्या प्रश्नांवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की, फाईल मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु त्या फाईलवर जेव्हा राज्यपाल सही करतील तेव्हा संपुर्ण राजभवनाला आम्ही पेढे वाटू फाईल मिळाली म्हणजे भूतानी पळवली नाही. पण भुतं त्यांच्या आसपास आहेत असा खोचक टोलाही राऊतांनी लगावला आहे. परंतु प्रश्न एवढाच आहे जो हायकोर्टाने विचारला आहे की, फाईलवर अद्याप निर्णय का होत नाही. ती बोफोर्सची यादी आहे का? ती यादी राफेलची आहे का? ती फाईल भ्रष्टाचाराची आहे का? असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत. राज्यापालांना देण्यात आलेली ती फाईल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात एकमताने मंजूर करुन १२ नामनियुक्त सदस्यांची फाईल आहे. त्या फाईलवर ६ ते ८ महिने निर्णय होत नसेल तर महाराष्ट्राच्या गतीमान प्रशासनाच्या परंपरेला ते शोभेसे नाही. राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात. राज्यपालांनी गतीमानता राज्याच्या कामात दाखवली तर नक्कीच महाराष्ट्राची परंपरा जी आहे ती गतीमान राहील असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांना राऊतांचे आवाहन

मोहनराव भागवत हे परमआदरणीय आहेत अनेक विषयांवर त्यांनी परखडपणे आपले मत व्यक्त करावेत अशी अपेक्षा असते. त्यांच्या भूमिकेला आणि त्यांच्या मताला देशात आजही महत्त्व दिले जात आहे. गेल्या काहीदिवसांपासून सर्वच गप्प आहेत. विशेषतः गंगेच्या प्रवाहात हजारो प्रेतं वाहून आली आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील झाले नाहीत. हा विषय हिंदुत्वाचा होता आणि तोही राम मंदिर इतकाच महत्त्वाचा होता. त्याच्यावर या देशातील हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा जनतेला होती परंतु मोहन भागवत यांनी या विषयावर परखड मत मांडावे अशी आमची अपेक्षा असल्याचेही शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

भाजपवर प्रकरण उलटल्यास कारवाई

मागील काहीदिवसांपासून देशात टुलकिट प्रकरण पुन्हा गाजत आहे. काँग्रेस टुलकिटच्या आधारे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असल्याा दावा भाजपने केला होता. यावर संजय राऊत यांनी म्हटले आहे की, टुलकिटचे प्रकरणावर पुर्ण देशात चर्चा सुरु आहे. परंतु ट्विटर, सोशल मीडिया किंवा टुलकिट असुद्यात या सर्व गोष्टींचा फायदा भाजपने घेतला आहे. परंतु हे प्रकरण त्यांच्यावर उलटल्याने त्यानंतर कारवाई वगेरे सुरु झाल्या असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलंय.

First Published on: May 25, 2021 10:46 AM
Exit mobile version