भरकटलेल्या मनाची माणसं गांजा प्यायल्यासारखं बोलतात; संजय राऊतांचं मुनगंटीवारांना प्रत्युत्तर

भरकटलेल्या मनाची माणसं गांजा प्यायल्यासारखं बोलतात; संजय राऊतांचं मुनगंटीवारांना प्रत्युत्तर

माजी अर्थमंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेसोबतची आमची युती ही ऐतिहासिक चूक होती, असं वक्तव्य केलं होतं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जकारणामध्ये विरोधी पक्ष भरकटलेला आहे. भरकटलेल्या मनाची माणसं गांजा प्यायल्यासारखं बोलतात, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भरकटलेल्या मनाची माणसं गांजा प्यायलासारखं बोलतात. राजकारणामध्ये विरोधी पक्ष ज्या पद्धतीने भरकटलेला आहे ते पाहता त्यांच्याकडून कोणत्या वक्तव्याची अपेक्षा करणार. सुधीर मुनगंटीवार यांना मी संयमी नेते समजत होतो, अभ्यासू नेते समजत होतो त्यांची भाषणे पाहतो विधान सभेतील पण कोणी कोणाबरोबर जावे कोणी कोणाबरोबर राहावे हा त्यांचा प्रश्न नसून महराष्ट्रात तीन पक्षाने ठरवले आहे

कधी राष्ट्रवादी बरोबर जावे असे वाटते कधी शिवसेना हाच नेचरल अलायन्स आहे म्हणतात. कधी अजून काही म्हणतात या सगळ्या महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कुठे तरी शांतपणे केदारनाथला जाऊन एक महिना बसण्याची गरज आहे आणि त्यांची डोकी थंडं झाली की परत महाराष्ट्रात येऊन राजकारण करावं. सध्या त्यांची मनस्थिती चांगली नाही आणि त्यांचे मन स्वास्थ ठीक व्हावे अशी या नवीन वर्षामध्ये मी ईश्वराला प्रार्थना करतो, असं राऊत म्हणाले.

 

First Published on: December 31, 2021 8:38 PM
Exit mobile version