सारथी अनियमितता प्रकरण: अप्पर मुख्य सचिवांची समिती करणार चौकशी

सारथी अनियमितता प्रकरण: अप्पर मुख्य सचिवांची समिती करणार चौकशी

सारथी अनियमितता प्रकरण: अप्पर मुख्य सचिवांची समिती करणार चौकशी

मराठा आणि कुणबी समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेले सारथी महामंडळ हे कोणत्याही पद्धतीत ते बंद केले जाणार नाही. त्याची स्वायत्तता टिकवून ठेवली जाणार असून या संस्थेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर जे कोणीही या प्रकरणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत सामाजिक न्याय मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. तर संस्थेला आतापर्यंत ३२ कोटी रुपये दिले असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, मराठा आणि कुणबी समाजाला आरक्षण देण्याच्या तसेच या समाजाच्या विकासासाठी सारथी या महामंडळाची सुरुवात राज्य सरकारतर्फे करण्यात आली. या संस्थेत अनियमितता झाल्यासंदर्भात आमदार वैभव नाईक यांच्यासह अनेक आमदारांनी मंगळवारी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी वरील माहिती दिली. तर यावेळी अनेक आमदारांनी मुंबईत मराठा आणि कुणबी समाजातील काही विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनात बसल्याकडे देखील त्यांचे लक्ष वेधले. याबद्दल बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, या विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा सोमवारी झाली असून त्यांच्या प्रश्नांबाबत लवकरात लवकर निर्णय घेतले जाणार असून हे विद्यार्थी मंगळवारी उपोषण मागे घेणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा – देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्याप्रकरणी खटला चालणार

यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सारथीच्या माध्यमातून ज्या सवलती, मानधन, शिष्यवृत्त्या दिल्या जात आहेत. ते यापुढे ही तशाच कायम राहणार आहेत. या संस्थेच्या माध्यमातून पाच उद्देशांसाठी संस्था काम करते. सध्या संस्थेच्या माध्यमातून ४०० विद्यार्थ्यांना सवलती दिल्या जातात. यात कोणाचेही नुकसान होणार नाही. आतापर्यंत ७० टक्के मानधन दिले गेले असून उर्वारित मानधनाचा प्रश्न पुढील दहा दिवसांत सोडविण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.

नवीन संचालक मंडळ येणार

या सारथी महामंडळात व्यवस्थपकीय संचालकांविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. या सारथी महामंडळावर लवकरच नवीन संचालक मंडळाची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.


हेही वाचा – राज्यात कुरीयरद्वारे होतेय ड्रग्जची तस्करी – अनिल देशमुख

महाज्योती मार्चमध्ये

सारथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी आणि वीजेएनटी समाजाच्या विकासाठी महाज्योती हे महामंडळ लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा वडेट्टीवार यांनी यावेळी केली. येत्या मार्चमध्ये या संस्थेचे काम सुरु होणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

 

First Published on: March 3, 2020 5:20 PM
Exit mobile version