कंगनानंतर आता अर्णब गोस्वामीवरुन सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं

कंगनानंतर आता अर्णब गोस्वामीवरुन सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवरील सविस्तर निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने ११ नोव्हेंबरला अर्णब गोस्वामी आणि इतर दोघांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. दरम्यान, शुक्रवारी अर्णव गोस्मावी यांच्या जामीनाचा कालावाधी तीन महिन्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ११ नोव्हेंबरला अर्णब गोस्वामी आणि इतर दोघांना अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली होती. दरम्यान, आज गोस्वामी यांच्या याचिकेवरील सविस्तर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. राज्य सरकार काही व्यक्तींना निशाण्यावर ठेऊन त्यांच्यावर कारवाई करणार असेल, तर त्यांनी सर्वोच्च न्यायालय नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करेल, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे.

 

First Published on: November 27, 2020 1:17 PM
Exit mobile version