अंबरनाथमध्ये शालेय विद्यार्थ्यांची बस उलटली; चालकाला घेतले ताब्यात

अंबरनाथमध्ये शालेय विद्यार्थ्यांची बस उलटली; चालकाला घेतले ताब्यात

अंबरनाथ – विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक खासगी मिनी स्कूल बस आज सकाळी पावणेसातच्या सुमारास उलटली. या बसमध्ये जवळपास १७ ते १८ विद्यार्थी होते. बस उलटल्यानंतर बसवर चढून स्थानिकांनी तातडीने विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. या अपघातात दोन विद्यार्थी किरोकोळ जखमी झाले आहेत. अंबरनाथमध्ये ग्रीन सिटी संकुलात ही घटना घडली.

अंबरनाथ रोटरी शाळेच्या विद्यार्थ्यांना ही बस घेऊन जात होती. ग्रीन सिटी संकुलात ही बस आली असता रिव्हरवूड इमारतीसमोरील उतारावर बस चालकाने बस रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला. परंतु बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बस उलटली. या घटनेनंतर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे.

अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी बस मालकाविरोधात संताप व्यक्त केलाय. या बसचा इन्शुरन्सही काढला नव्हता. तसंच, बस अत्यंत मोडकळीस आली होती. ही बस शाळेची नसल्याचं रोटरी शाळेच्या व्यवस्थापकांनी स्पष्ट केलं आहे. पालक आपल्या सोयीनुसार, बस ठरवून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत असतात, असं स्पष्टीकरण व्यवस्थापकांनी दिलंय. तसंच, बस मालकाला आम्ही समज देणार आहोत, असंही या शाळेच्या मुख्यध्यापकांनी सांगितलं.

First Published on: September 26, 2022 1:32 PM
Exit mobile version