नाशिकमधील शाळा सोमवारपासून, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

नाशिकमधील शाळा सोमवारपासून, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

राज्यातील आदर्श शाळांसाठी ५३ कोटीचा निधी

ओमायक्रॉनचा संसर्ग वाढताच राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवार (दि. २४) पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा व आश्रमशाळाही सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या महापालिका, जिल्हा परिषद, खासगी शिक्षण संस्थांच्या सुमारे ५ हजार शाळा आहेत. त्यात साधारणत: १० लाख विद्यार्थी शिकतात. या सर्व शाळा १० जानेवारीपासून बंद आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता शासन निर्णयानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा दिनांक २४ जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबत औपचारिक आदेश लवकरच निर्गमित करण्यात येतील.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक

First Published on: January 21, 2022 1:32 PM
Exit mobile version