साहित्य संमेलनात शतकातील विज्ञान साहित्य स्मरणिकांना उजाळा

साहित्य संमेलनात शतकातील विज्ञान साहित्य स्मरणिकांना उजाळा

शहरात होणार्‍या ९४ व्या अखिल संमेलनात यंदा प्रथमच १०० वर्षातील विज्ञान साहित्य या विषयावर स्मरनिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संमेलनस्थळी लेखक व प्रकाशनांना पुस्तक विक्रीसाठी ४०० स्टॉल उपलब्ध केले जाणार आहेत. आत्तापर्यंत ११० जणांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली.

भुजबळ फार्मवर रविवारी (दि.२१) दुपारी २ वाजता संमेलन तयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर कौतिकराव ठाणे-पाटील व स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. साहित्य संमेलनात पारंपारिक पद्धतीसोबतच यंदा ज्वलंत सामाजिक प्रश्वांवर चर्चा होणार आहे. संमेलनात सामाजिक प्रश्नांवरदेखील चर्चा होणार आहे. साहित्याशी जोडून सर्वस्पर्शी चर्चा होणार आहे. संमेलनात कोरोना आणि शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोन तासांचे परिसंवाद मुख्य मंडपात होणार आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली.

First Published on: February 21, 2021 11:59 PM
Exit mobile version