सहकारमंत्री सुभाष देशमुखांना मोठा दणका

सहकारमंत्री सुभाष देशमुखांना मोठा दणका

सहकारमंत्री सुभाष देशमुख

गुंतवणूकदारांचे ७४ कोटी रुपये परत करण्याचे ‘सेबी’चे आदेश न पाळल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना ‘सेबी’ने चांगलाच दणका दिला आहे. सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल’चे म्युच्युअल फंड आणि डी मॅट खाते सेबीकडून सील करण्यात आले आहे. तसेच ७४ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी सुभाष देशमुख यांना नोटीसही बजावण्यात आली आहे.गुंतवणूकदारांचे ७४ कोटी रुपये ३ महिन्यांत परत करण्याचे आदेश ‘सेबी’ने १६ मे २०१८ रोजी दिले होते. मात्र, मागील सहा महिन्यांपासून लोकमंगलने ‘सेबी’च्या आदेशाला उत्तरच दिलेले नाही.

‘सेबी’चे उल्लंघन केले नाहीः देशमुख
लोकमंगलने सेबीने सांगितलेल्या नियमांचे उल्लंघन केलेले नाही. ‘सेबी’ने ३ महिन्यांत पैसे परत करण्याची प्रक्रिया करावी असे आदेश दिले होते. ती प्रक्रिया आम्ही पाळली आहे. ज्यांना शेअर्स परत घ्यायचे आहेत त्यांनी परत घ्यावेत अशी नोटीस देशभरातील सर्व दैनिकात आम्ही दिली तसेच ज्यांनी ज्यांनी पैसे मागितले त्यांना पैसे दिलेत. साधारण २० ते २५ कोटी परत दिले आहेत आणि भविष्यातही ती रक्कम परत देत आहोत . पण, राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी अशाच पध्दतीने शेअर्स जमा केले. मग आमच्यावरच कारवाई का? हे कळत नाही ,असा सवालही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

नक्की काय कारवाई केली?

First Published on: January 6, 2019 5:18 AM
Exit mobile version