Video: करोनामुळं राज्यात जमावबंदी; पण विश्वास नांगरे पाटलांच्या नाशकात सर्रास जुगार अड्डे सुरू

Video: करोनामुळं राज्यात जमावबंदी; पण विश्वास नांगरे पाटलांच्या नाशकात सर्रास जुगार अड्डे सुरू

नाशिकमध्ये सर्रास जुगार सुरु

करोना विषाणूचा संसर्ग सर्वदूर पसरू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यानुसार गर्दी होणारे सार्वजनिक कार्यक्रम मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृह, बाजार यात्राही रद्द करण्यात आल्या आहेत. गर्दी जमवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येत आहे. असे असतानाही शहरातील भद्रकालीसह अनेक भागांत राजरोसपणे जुगाराचे अड्डे सुरू आहेत. या अड्ड्यांवर जुगारी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. त्यामुळे पोलिसांनी किमान करोनाच्या भितीखातर तर या अड्ड्यांवर कारवाई करावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करत आहेत. करोना अजाराने जगभर भीतीच वातावरण पसरलं आहे. त्यामुळे या करोना आळा घालण्यासाठी सरकारकडून खबरदारीचे उपाय केले जात आहेत. महाराष्ट्रात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सार्वजिनक ठिकाी नागरिकांनी एकत्रीत येऊ नये, असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

 

सार्वजिनक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जात असे. मात्र शहरात खुलेआम भद्रकाली, पंचवटी, सातपूर आणि नविन नाशिक परिसरात जुगार अड्डे सुरू आहेत. शहरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे – पाटील विषेश पथकाची नेमणूक केली आहे. पथकामार्फत सुरूवातीला सातत्यपूर्ण शहरातील जुगार अडड्यांवर छापे टाकले जात होते. त्यामुळे जुगार खेळणाऱ्यांची पळापळ झाली होती. पण काही काळानंतर परिस्थिती जैसै थे झाली. आता पोलिस या अडड्यांवर कारवाई करताना दिसत नाही.

त्यामुळे स्थानिक पोलिसांचे जुगारचालकांशी अर्थपूर्ण संपर्क असल्याने त्यांच्या अशीर्वादाने जमावबंदी असतानाही जुगार अड्डे सुरू आहेत. असा आरोप नागरिकांनी केला आहे. पोलीस आणि जुगार अड्डे चालकांचे साटेलोटे असल्यानेच असे अवैध धंदे सर्रासपणे सुरू असल्याचे बोलले जाते. परंतु सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होते तेव्हा तरी पोलिसांनी कर्तव्या चे पालन करून अडड्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आदर्श पोलीस अधिकारी आणि उत्तम वक्ते म्हणून प्रसिद्ध असलेले पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नाशिकमध्ये ठिकठिकाणी सर्रासपणे जुगार अड्डे सुरू आहेत. राज्यात सर्वत्र जमावबंदीचे आदेश लागू असताना जुगार अड्ड्यांवर मात्र जुगार्यांचा मोठा जमाव रोज एकत्र येतो. लाखोंची उलाढाल होते. ज्या भद्रकाली परिसरात अड्डा सुरू आहे त्याच परिसरातील व्हिडीओ हॉल मात्र पोलिसांनी ‘शिताफीने’ बंद करायला लावलेय. शहरातील शाळा, मॉल्स, चित्रपट गृह, नाट्यगृह, आठवडे बाजार हे आणि असे असंख्य गर्दीचे ठिकाणे बंद करण्यात आलेय. मग जुगाऱ्यांवरच ‘ कृपादृष्टी’ का असा सवाल केला जातोय.

जुगाऱ्यांच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग पसरू शकत नाही का? की जुगाऱ्यांना अँटी व्हायरस लावलाय? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताय. पोलीस आयुक्तपदी कुलवंतकुमार सरंगल असतांना शहरातील जुगार अड्डे बंद करण्यात आले होते. त्यांच्यानंतर मात्र ‘लुटुपटू’च्या करवाया करत देखावा उभा करण्यात आला. प्रत्यक्षात भद्रकाली, जुने नाशिक, पंचवटी, सातपूर, नवीन नाशिक आणि नाशिकरोड परिसरात राजरोसपणे जुगार अड्डे सुरू आहेत. त्यात अनेक तरुण भरडले जाताय. अनेकांचे संसार उद्धवस्थ झालेय. किमानपक्षी करोनाची तरी भीती बाळगून पोलिसांनी हे अड्डे बंद करावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नाशिककर व्यक्त करत आहेत.

First Published on: March 19, 2020 12:53 PM
Exit mobile version