सीरममधील आगीचा लसीकरणावर कोणताही परिणाम नाही – मुख्यमंत्री

सीरममधील आगीचा लसीकरणावर कोणताही परिणाम नाही – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सीरमच्या ज्या इमारतीला आग लागली त्याची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना कोविशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहती दिली. शिवाय, सीरममधील आगीचा लसीकरणावर कोणताही परिणाम होणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अहवाल येत नाही तोपर्यंत निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.

सीरम इन्स्टिट्यूला लागलेल्या आगीची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच हा घातपात होता की अपघात होता हे कळेल. त्याआधी काहीही भाष्य करणं घाई ठरेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये येऊन आगीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार गिरीश बापट, आदर पुनावाला, सायरस पुनावाला आणि आमदार चेतन तुपे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. आग कशामुळे लागली?, किती नुकसान झालं? बीसीजी लसी सुरक्षित आहेत का? आदींची माहिती घेतानाच आगीतील मृत कामरांविषयीची माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली.

जिथे कोरोनावरील लस बनवली जात होती. तसंच लस जिथे ठेवली जाते तिथे कोणतीही दुर्घटना झालेली नाही. त्यामुळे लस पूर्णपणे सुरक्षित आहे. तसंच कोरोनावरील लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आगीच्या घटनेची चौकशी सुरु आहे. या चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतरच समजेल की हा अपघात होता की घातपात. दरम्यान, या दुर्घटनेत ज्या कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यांची जबाबदारी कंपनीने घेतली आहे. तरीदेखील काही आवश्यकता असल्यास सरकारही त्यासंबंधी पुढाकार घेईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

First Published on: January 22, 2021 5:38 PM
Exit mobile version