गर्भाशयाच्या कर्करोगावर पहिलीच स्वदेशी लस तयार, सीरम आज करणार लॉन्च

गर्भाशयाच्या कर्करोगावर पहिलीच स्वदेशी लस तयार, सीरम आज करणार लॉन्च

नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांपासून भारतात गर्भाशयाच्या कर्करोगाचे (Cervical Cancer) रुग्ण वाढले होते. आता यावर प्रभावी स्वदेशी लस उपलब्ध झाली आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने यावर प्रभावी लस शोधून काढली असून आज या लसीचे अनावरण करण्यात येणार आहे. क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (qHPV) असं या लसीचं नाव असून या स्वदेशी लसीचा फायदा देशभरातील अनेक महिलांना होणार आहे.

भारतात १५ ते ४४ वयोगटातील महिलांमध्ये Cervical Cancer म्हणजेच गर्भाशयाचा कर्कगोर हा दुसरा सामान्य आजार आहे. त्यामुळे या कर्करोगावर आळा बसण्यासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सीरम इन्स्टिट्यूटला लस तयार करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार सीरमने ही लस तयार केली आहे.

गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस परदेशातून भारतात यायची. त्यामुळे या लसीची किंमत अवाक्याबाहेर होती. भारतीय रुग्णांना स्वदेशी लस अल्प किंमतीत मिळावी याकरता सीरमने ही लस विकसित केली आहे. १२ जुलै रोजी डीसीजीआकडून सीरमला मार्केट ऑथरायझेशन मिळालं होतं. त्यानंतर अवघ्या दीड महिन्यांत सीरम ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे.

First Published on: September 1, 2022 8:03 AM
Exit mobile version