नगरमध्ये तरुणीवर बलात्कार; सात आरोपी फरार

नगरमध्ये तरुणीवर बलात्कार; सात आरोपी फरार

नगरमध्ये तरुणीवर बलात्कार; सात आरोपी फरार

अहमदनगर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका युवतीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी अत्याचाराचे व्हिडिओ आणि फोटो काढून ते व्हायरल करु, अशी धमकी देत मुलावर वारंवार बलात्कार केला. या घटनेप्रकरणी श्रीगोंदा पोलीसांनी बाजार समिती संचालक, माजी सरपंचासह ७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल होताच सर्व सात आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. लखनकुमार काकडे, श्रीगोंदा बाजार समिती संचालक तथा भाजपा नेता लक्ष्मण नलगे, माजी सरपंच शुभांगी नलगे, सुधीर नलगे, भाऊ नलगे, कुमार काकडे आणि स्नेहल काकडे(भोसले) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी श्रीगोंदा तालुक्यातील लोकी व्यंकनाथ येथील रहिवासी आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

सदर प्रकरणी पिडीत युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लखनकुमार काकडे याने पिड़ीत तरूणीशी जबरदस्तीने प्रेमसंबंध जुळविण्याचा प्रयत्न केला. मात्र युवतीने नकार दिला असता त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. १ फेब्रुवारी २०१९ रोजी लखनकुमार काकडे याने सायंकाळच्या वेळी घरा शेजारील शेतात पिडित तरूणीवर अत्याचार केला. अत्याचार करीत असतांना त्याने या मुलीचे आक्षेपार्य फोटो काढले. तसेच व्हिडिओ चित्रीकरण देखील केले. या प्रकाराची माहिती समजताच लक्ष्मण नलगे यांनी सदर युवतीस बोलावून घेतले. त्यावेळी काकडे, सुधीर नलगे, भाऊ नलगे आदिंनी संगनमताने तरूणीला बळजबरीने विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तरूणीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला सुरूवातीला काष्टी येथील रूग्णालयात आणि नंतर दौंड येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर रूग्णालयातून घरी सोडल्यानंतर पिडीत तरूणी गावात परतली. त्यावेळी तिने आरोपी लखन याला सदरचे फोटो आणि चित्रीकरण डिलीट करण्यास सांगितले. मात्र त्याने नकार देऊन पुन्हा तरूणीकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच सदरचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवून बदनामी करण्याची धमकी दिली. अखेरीस या जाचाला कंटाळून पिडीत तरूणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गेली असता आरोपींनी तिला तेथून बाजूला नेऊन मारहाण करीत जातीवाचक शिविगाळ देखील केली. दरम्यान या प्रकरणातील आरोपी राजकीय दृष्टिने प्रभावी असल्याने पोलीसांवर गुन्हा दाकल न करण्यासाठी मोठा दबाव टाकण्यात आला होता. मात्र पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच सर्व आरोपी फरार झाले आहेत.

First Published on: July 26, 2019 4:22 PM
Exit mobile version