Corona : लॉकडाऊनमध्येही नमाज पठण; पुण्यातून १७ जणं ताब्यात

Corona : लॉकडाऊनमध्येही नमाज पठण; पुण्यातून १७ जणं ताब्यात

प्रातिनिधिक फोटो

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना वारंवार प्रशासनाकडून घरात राहण्याचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. लॉकडाऊनचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र पुण्यातील गणेश पेठ परिसरात लोकांकडून त्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.

नमाजसाठी एकत्र आलेल्या १७ जणं ताब्यात

राज्यात लॉकडाऊन तसेच संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन असतानाही नमाजसाठी एकत्र आलेल्या पुण्यातील गणेश पेठेतील एका धार्मिक स्थळावरून १७ जणांना ताब्यात घेतले आहे. या १७ जणांपैकी काही जण हे मुळचे रांचीचे रहिवासी आहेत तर ४ जण स्थानिक असून कोरोनाचा धोका लक्षात घेता सर्वांना कोरोना चाचणीसाठी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


VIDEO: कोरोनाविरुद्ध पुणे पोलिसांनीही कसली कंबर; रक्षणकर्त्यांची आर्त हाक नक्की ऐका!
First Published on: April 11, 2020 12:10 AM
Exit mobile version